हेगडे यांनी राजीनामा द्यावा . ‘ : खा . वंदना चव्हाण
पुणे :
‘घटना बदलण्यात येईल ,आणि घटना बदलण्यासाठी आम्ही आलो आहोत’, ‘धर्मनिरपेक्ष आणि विचारवंत व्यक्तींनी स्वतःचे रक्त कुठले असे माहित नसते ‘अशा निरर्गल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार एड . वंदना चव्हाण यांनी निषेध केला आहे .
हे वक्तव्य करताना हेगडे यांनी संविधानाचा,मानवतेचा अपमान केला आहे . हे वक्तव्य सत्तेचा उन्माद दाखविणारे आहे ,रक्त -वर्ण -जाती यावरून मानवतेचा अपमान करणारे आहे . भाजप परिवाराच्या पोटातील विचार ओठावर आले आहेत ,पण जनता हे देशविरोधी विचार खपवून घेणार नाही. त्यांनी आपली सार्वजनिक जीवनातील मर्यादा ओलांडली असून तातडीने राजीनामा द्यावा . ‘,अशी मागणी खा . वंदना चव्हाण यांनी केली आहे .