पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार संजय काकडे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दलच्या त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला . एका पक्षातून खासदारकी विकत घेणाऱ्या व दुसऱ्या पक्षाची जबरदस्तीने चाकरी करणाऱ्या सामाजिक व राजकीय मूळ नसणाऱ्या खासदाराने केलेल्या वक्तव्याचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात कडक शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. काही वर्षांपूर्वी बाबा बोडके यांची माहिती मिळाल्यानंतर आमच्या नेत्यांनी बाबा बोडकेला माशी सारखे झटकले , मांडीवर घेण्याचा प्रश्नच नाही, असा मुद्दा रवींद्र माळवदकर यांनी बैठकीत मांडला . या बैठकीला रवींद्र माळवदकर , बाबुराव चांदेरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते . काकडे हे कायदेतज्ञ असल्याप्रमाणे गुनेहगरांचे समर्थन करत आहेत तर त्यांनी सर्वच मोकाट गुन्हेगारांना पक्षात घेऊन पक्ष वाढवावा असा टोलाही या बैठकीत लगावण्यात आला. संजय काकडे हे पाच दहा वर्षांपूर्वीपर्यंत रोज सकाळी उठून कोणाच्या दारात उभे असायचे हे टीका करताना विसरले वाटते. स्वतः ज्याप्रमाणे अनैतिक मार्गाने पदे मिळवली आहेत तोच मार्ग इतरांना दाखवताना राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करू नये. अन्यथा तुमची योग्य ती जागा दाखवून देऊ असा इशारा या बैठकीतून देण्यात आला आहे.