महापालिकेवर कंट्रोल माझाच;लबाड अधिकाऱ्यांची खैर नाही-खा. बापट (व्हिडिओ)
पुणे-कामात दिरंगाई करणाऱ्या लबाड ,लुच्च्या अधिकाऱ्यांची खैर केली जाणार नाही ,आणि महापालिकेवर माझेच नियंत्रण होते आणि माझेच राहील अशी दोन विधाने आज दोन प्रश्नांना उत्तरे देताना विभागून खासदार गिरीश बापट यांनी केली असली तरी या दोन विधानांनी शहर भाजपच्या गोटात चर्चेला उधाण येणार आहे .अर्थात या दोन विधानांनी खासदार झाल्यावर हि बापट यांनी शहराचे नेतृत्व आपल्याकडेच होते आणि राहील असे संकेत दिल्याचे मानले जाते .
खासदार झाल्यानंतर आज महापौर बंगल्यावर बापट यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेतली .खासदार झाल्यानंतर बापट हे दिल्ली दरबारी रुजू होतील , आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा झाल्यानंतर …आता विधानसभा निवडणुकीनंतरच पुण्याचं नेतृत्व नेमकं कुणाकडे राहील ? याबाबत काही राजकीय ठोकताळे बांधले जात होते . स्पष्टच सांगितले जाऊ लागले होते कि आता बापट पुणे महापालिकेच्या राजकारणा बाहेर जातील. आणि महापालिकेची सत्ता ,तिथले राजकारण ज्याच्या हाथी तो शहराचा नेता असे समीकरण मांडले जाते .
या पार्श्वभूमीवर आज खा. बापट यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केलेल्या विधानांना विशेष राजकीय महत्व दिले जाते आहे. अनिल शिरोळे यांनी खासदार असताना महापालिकेच्या राजकारणावर ,सत्तेवर विशेष पकड ठेवली नाही. आणि पालकमंत्री असलेल्या बापट यांनी महापालिकेच्या राजकारणात सातत्याने संपर्क ठेवला आणि पर्यायाने ते खासदार असूनही शिरोळे हे शहराचे नेते होऊ शकले नव्हते . आता विधान सभेपूर्वीच बापटांनी आपल्या नेतृत्वाची पताका फडकविल्याचे यातून स्पष्ट होते आहे.
दरम्यान बापट यांनी नेमके पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नेमके काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात ऐका ..व पहा …