पुणे-मनसे चे नगरसेवक वसंत मोरे यांच्या प्रयत्नातून कात्रज येथे डिलाईट बेकरीसमोर सरकारी दवाखान्याच्या भूमिपूजन प्रसंगी राज ठाकरे यांनी माध्यमांना ‘मी नारळ नाही फोडणार ,मी कुदळ मारणार ‘असा हातानेच इशारा केल्याने .. राज ठाकरे यांच्या या इशाऱ्याला ‘गर्भित इशारा ‘ समजायचे काय ? यावरून राजकीय चर्चेला सुरुवात झाली .अर्थात तत्पूर्वी अनिल शिदोरे आणि वसंत मोरे यांनी नारळ फोडला होता ,त्यामुळे कदाचित राज यांनी ‘ मी आता कुदळ मारणार’ असा इशारा केला असेल . पण निवडणुकीच्या तोंडावर राज यांच्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देऊन येथील राजकीय सामिक्षकांमध्ये या इशाऱ्यावर चर्चा रंगली नाही तर नवलच .
या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी जमली होती . मोबाईल कॅमेरा वर चित्रीकरण करण्यासाठी झालेल्या गर्दीने या कार्यक्रमात व्यत्तय येत होता.अनिल शिदोरे,रुपाली पाटील ,किशोर शिंदे ,गणेश सातपुते आदी कार्यक्रमाला उपस्थित होते .याभागातील मुस्लीम समाजाची उपस्थिती लक्षणीय होती . महापालिकेचे अधिकारी पठाण यांचा सत्कार यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला .पहा या कार्यक्रमाची व्हिडीओ झलक ….