पुणे-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आदेशावरून बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे व पुण्याचे उमेदवार मोहन जोशी यांना मनसेचे गटनेते वसंत मोरे व नगरसेवक साईनाथ बाबर यांनी जाहीर पाठिंबा दिला मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तन मन धनाने वरील चारही उमेदवारांचा प्रचार करतील व मोदी शहा या अभद्र समीकरणाला व युतीला पुणे जिल्ह्यात संपूर्णपणे पराभूत आणि नेस्तनाबूत करू अशी भूमिका मांडली
तसेच शिरूर चे उमेदवार अमोल कोल्हे यांना वसंत मोरे व साईनाथ बाबर यांनी त्यांचे महानगरपालिकेचे एक महिन्याचे मानधन अमोल कोल्हे यांना निवडणूक निधी म्हणून राष्ट्रवादीचे पुणे शहराचे अध्यक्ष चेतन पाटील तुपे यांच्या कडे सुपूर्द केले
याप्रसंगी चेतन पाटील तुपे यांनी सांगितले की महाआघाडी बरोबर आज मनसे देखील पूर्ण ताकतीने प्रचारामध्ये उतरली आहे आहे त्यामुळे महाआघाडीच्या जिल्ह्यातील चारही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील तसेच आता ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होत आहे त्यामुळे अडाणी अंबानीच्या पाठिंब्यावरती लढणारे सत्ताधारी आणि सामान्य जनतेच्या मनातले त्यांना भावणारे आपले वाटणारे उमेदवार अशी आहे आणि ज्यावेळी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा लढा झाला आहे त्यावेळी जनतेचे उमेदवार निवडून आले आहेत आहेत त्यामुळे सुप्रिया सुळे पार्थ पवार अमोल कोल्हे मोहन जोशी यांचा विजय निश्चित आहे