मुंबई-भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुक्ता टिळक, अतुल भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 125 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने 52 विद्यमान आमदारांना तिकीटं दिली आहेत. तर 12 महिलांना यंदा उमेदवारी दिली आहे. १२ मतदारसंघांची आदलाबदल करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पुण्यातील आठही जागा भाजपाच्या वाटेला तर मुंबईतील १९ जागा या शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. विदर्भ (३८), उत्तर महाराष्ट्र (११), मुंबई-ठाणे (२०), कोकण (२) , पश्चिम महाराष्ट्र (३१) इतक्या जागांवरील उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. दरम्यान, पहिल्या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.उत्सुकता लागून राहिलेल्या काही महत्वाच्या मतदारसंघांपैकी कसबा मतदारसंघातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवरुन यापूर्वी नुकतेच खासदार झालेले गिरीश बापट पाच वेळा निवडून आले आहेत. त्याचबरोबर पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अपेक्षेप्रमाणे साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसेल यांना, तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपची पहिली यादी
१) नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस
२)पुणे- कोथरूड – चंद्रकांत पाटील
३) नंदूरबार – विजयकुमार गावित
४) नवापूर – भारत गावित
५) रावेर – हरीभाऊ जावळे
६) भुसावळ – संजय सावकारे
७) अकोला (प.) – गोवर्धन शर्मा
८) अकोला (पू.) – रणधीर सावरकर
९) जामनेर – गिरीश महाजन
१०) जळगाव जामोद – संजय कुटे
११) शहादा – राजेश पडवी
१२) जळगाव शहर – सुरेश भोळे
१३) सिंदखेडा – जयकुमार रावल
१४) धुळे ग्रामीण – ज्ञानज्योती बदाणे
१५) अमळनेर – शिरीष चौधरी
१६) चाळीसगाव – मंगेश चव्हाण
१७) माण – जयकुमार गोरे
१८) तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
१९) अकोले – वैभव पिचड
२०) राहुरी – शिवाजीराव कर्डिले
२१) औसा – अभिमन्यू पवार
२२) वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
२३) नाशिक मध्य – देवयानी फरांदे
२४) ऐरोली – संदीप नाईक
२५) शिर्डी – राधाकृष्ण विखे-पाटील
२६) इंदापूर – हर्षवर्धन पाटील
२७) अमरावती – सुनील देशमुख
२८) वर्धा – पंकज भोयर
२९) मूर्तिजापूर – हरीश पिंपळे
३०) पुणे कँटोन्मेंट – सुनील कांबळे
३१) वाशिम – लखन मलिक
३२) कारंजा – राजेंद्र पटणी
३३) दर्यापूर – रमेश बुंदिले
३४) मोर्शी – डॉ. अनिल बोंडे
३५) आर्वी – दादाराव केंचे
३६) हिंगणघाट – समीर कुणावार
३७) नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे
३८) उमरेड – सुधीर पारवे
३९) हिंगणा – समीर मेघे
४०) राजुरा – संजय धोत्रे
४१) आमगाव – संजय पूरम
४२) मलकापूर – चैनसुख संचेती
४३) चिखली – श्वेत महाले
४४) खामगाव – आकाश फुंडकर
४५) अकोट – प्रकाश भारसाकळे
४६) सावनेर – राजीव पोतदार
४७) नागपूर दक्षिण – मोहन मते
४८) नागपूर मध्य – विकास कुंभारे
४९) नागपूर पश्चिम – सुधाकर देशमुख
५०) नागपूर उत्तर – मिलिंद माने
५१) अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
५२) तिरोरा – विजय रहांगदले
५३) आरमोरी – कृष्णा गजभे
५४) गडचिरोली – देवराव होली
५५) चंद्रपूर – नाना शामकुळे
५६) बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
५७) चिमूर – किर्तीकुमार भांगडिया
५८) वणी – संजीव रेड्डी बोदकुरवार
५९) राळेगाव – अशो उइके
६०) यवतमाळ – मदन येरावार
६१) आर्नी – संदीप धुर्वे
६२) भोकर – बापुसाहेब गोर्ठेकर
६३) मुखेड – तुशार राठोड
६४) हिंगोली – तानाजी मुटकुळे
६५) परतूर – बबनराव लोणीकर
६६) बदनापूर – नारायण कुचे
६७) भोकरदन – संतोष दानवे-पाटील
६८) फुलंब्री – हरीभाऊ बागडे
६९) औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
७०) परळी – पंकजा मुंडे
७१) गंगापूर – प्रशांत बम
७२) चांदवड – राहुल आहेर
७३) नाशिक पश्चिम – सीमा हिरे
७४) डहाणू – पास्कल धनारे
७५) विक्रमगड – हेमंत सावरा
७६) भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
७७) मुरबाड – किसन कथोरे
७८) कल्याण पूर्व – गणपत गायकवाड
७९) डोंबिवली – रवींद्र चव्हाण
८०) मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता
८१) ठाणे – संजय केळकर
८२) दहिसर – मनीषा चौधरी
८३) मुलुंड – मिहीर कोटेचा
८४) कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
८५) चारकोप – योगेश सागर
८६) घाटकोपर (प.) – राम कदम
८७) गोरेगाव – विद्या ठाकूर
८८) विलेपार्ले – पराग अळवणी
८९) सायन कोळीवाडा – तामीळ सेल्वन
९०) वडाळा (मुंबई) – कालिदास कोळंबकर
९१) मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
९२) बेलापूर – मंदा म्हात्रे
९३) पनवेल – प्रशांत ठाकूर
९४) पेन – राजीवशेठ पाटील
९५) शिरूर – बाबुराव पाचर्णे
९६) चिंचवड – लक्ष्मण जगताप
९७) पुणे -पर्वती – माधुरी मिसाळ
९८) कसबा पेठ – मुक्ता टिळक
९९) भोसरी – महेश लांडगे
१००) वडगाव शेरी – जगदीश मुळीक
१०१) शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
१०२) खडकवासला – भीमराव तापकिर
१०३) हडपसर – योगेश टिळेकर
१०४) कोपरगाव – स्नेहलता कोल्हे
१०५) सातारा- शिवेंद्रराजे भोसले
१०६) कराड दक्षिण – अतुल भोसले (पंढरपूर देवस्थान अध्यक्ष)
१०७) नेवासा – बाळासाहेब मुरकुटे
१०८) शेवगाव – मोनिका राजळे
१०९) श्रीगोंदा – बबनराव पाचपुते
११०) कर्जत जामखेड – राम शिंदे
१११) गोराई – लक्ष्मण पवार
११२) माजलगाव – रमेश अडसकर
११३) अष्टी – भीमराव धोंडे
११४) अहमदपूर – विनायक किसन जाधव-पाटील
११५) निलंगा – संभाजी पाटील-निलंगेकर
११६) सोलापूर शहर उत्तर – विजयराव देशमुख
११७) सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
११८) वाई – मदन भोसले
११९) कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
१२०) इचलकरंजी – सुरेश हाळवणकर
१२१) मिरज – सुरेश खाडे
१२२) सांगली – सुधीर गाडगीळ
१२३) शिराळा – शिवाजीराव नाईक
१२४) जत – विलासराव जगताप
१२५) अंधेरी पश्चिम – अमित साटम