पुणे- कँटोंमेंट विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार रमेश बागवे हे येत्या ३ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत .हि निवडणूक आपण मतदार संघातील नागरिक, कार्यकर्ते ,आणि आपल्या कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी यांच्या प्रेमावरच जिंकणार आहोत असा दावा हि त्यांनी केलाय .दरम्यान या मतदार संघातील आपला उमेदवार भाजप सेने ने अद्याप हि अधिकृत पणे जाहीर केलेला नाही .