पुणे :गिरीश बापट लोकसभा लढवतील असे सांगत कसब्यासह खडकवासला,हडपसर आणि वडगाव शेरी विधानसभा मतदार संघावर वर शिवसेनेने दावा करायचा निर्धार केल्याचे सांगण्यात येत आहे . त्यामुळे भीमराव तापकीर ,योगेश टिळेकर आणि जगदीश मुळीक यांना आपापल्या विधानसभा उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत .
भारतीय जनता पार्टी-शिवसेनेच्या युतीची घोषणा आज झाली. युतीत झालेल्या जागावाटपानुसार 2009 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा शिवसेनेला तब्बल 21 जागा अधिक मिळाल्या आहेत. फिफ्टी-फिफ्टीचा फार्म्युला विधानसभे साठी वापरण्यात येणार आहे त्यामुळे खडकवासला ,हडपसर आणि वडगाव शेरीसह कसब्यावर शिवसेना दावा करेल असे सांगितले जाते आहे .भाजपचे सध्या पुण्यात आठ आमदारआहेत या जागांमधील पुण्यातील आठपैकी नेमक्या कोणत्या जागा शिवसेनेला सोडाव्या लागणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. लोकसभा निवडणूक गिरीश बापट लढविणार असा कयास धरून शिवसेना कसब्यावर हक्क सांगेल असेही म्हटले जाते आहे .खडकवासल्यात राष्ट्रवादी नेमोथा जोर लावला आहे या पार्श्वभूमीवर सातत्याने निवडून आलेले तापकीर यांच्या ऐवजी शिवसेनेला हि जागा देवून रमेश कोंडे चा येथून विचार होऊ शकतो असे काहींचे म्हणणे आहे.
खडकवासला , हडपसर,कसबा, वडगाव शेरी या चार जागा शिवसेनेकडून मागितल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीसाठी भाजपच्या विद्यमान आमदार भीमराव तापकीर व हडपसरचे आमदार योगेश टिळेकर आणि वडगाव शेरी चे मुळीक यांना संघर्ष करावा लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जाऊ लागली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. त्याआधी 2009 च्या निवडणुकीत दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून लढले. त्यावेळी कोथरूडमधून चंद्रकांत मोकाटे तर हडपसरमधून महादेव बाबर निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेला वाढून मिळालेल्या जागांमध्ये कोथरूड व हडपसरची जागा मिळावी, असा आग्रह शिवसेनेकडून राहण्याचीहि शक्यता पक्षातील काही जणांनी व्यक्त केली आहे.याशिवाय काहींचे मत असेही आहे कि आता कोथरूड मध्ये भाजपचे प्राबल्य आहे त्यामुळे कोथरूड भाजपकडेच राहील आणि वडगाव शेरी च्या जागे साठी महापालिकेतील गटनेते संजय भोसले आग्रही असल्याने त्यांच्या साठी वडगाव शेरीच्या जागेचा आग्रह धरला जाईल .
अखेरीस चार नाही तर पुण्यातून किमान तीन जागा सोडण्याचा आग्रह शिवसेनेकडून होणार आहे,असा अनेकांचा विश्वास आहे. जर बापट लोकसभा लढले नाहीत तर त्यात हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी असा शिवसेनेचा आग्रह राहील असे बोलले जाते .
महादेव बाबर हडपसरमधून तर चंद्रकांत मोकाटे कोथरूडमधून युतीचे आमदार होते. हे दोघे आता माजी आमदार असून पुणे शहर शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत. मात्र कोथरूड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. .कोथरूडमधून निवडून आलेल्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात कामाचा झपाटा लावला आहे. त्यामुळे इतका भक्कम मतदाररसंघ शिवसेनेसाठी सोडण्यास भाजपा सहजासहजी तयार होईल, असे वाटत नाही. हडपसरमध्ये भाजपचा पहिल्यांदाच आमदार झाला आहे. येथे पक्षाच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. टिळेकर हे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.मात्र मनसे च्या वसंत मोरेंच्या उमेदवारीने त्यांना मोथे आवाहन निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर हडपसर चा धोका पत्करायचा कि नाही यावर पक्षाला निर्णय घ्यावा लागणार आहे .