गिरीश बापटांनी उडविली आघाडीच्या उमेदवारांची खिल्ली (व्हिडीओ)
पुणे-पुण्यामध्ये मी रोज बघायचो ,माझ्यापुढे कोण पैलवान शड्डू ठोकून येतो ,जो पैलवान आला, तो रेवड्या हातात घेवून आला .. अशा शब्दात आज भाजप चे उमेदवार गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांची खिल्ली उडविली .
पुण्यात यांना उमेदवार मिळत नव्हता , शिरूर मध्ये आयात केला ,मावळात अजितदादांचा स्वार्थ- पार्थ ला बकरा बनविला … अशा शब्दात त्यांनी विरोधकांची आणि त्यांच्या उमेदवारांची खिल्ली उडविली . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , खासदार संजय काकडे, आमदार जगदीश मुळीक,योगेश मुळीक ,योगेश गोगावले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .पहा आणि ऐका नेमके बापट काय म्हणाले ….