पाण्याची गळती थांबवा-अण्णा जोगदंड
पिंपरी-भोसरी-टेल्को रोड वर होणारी पाण्याची गळती थांबवा अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केली आहे.
भोसरी-टेल्को रोड वर थरमॅक्स कंपनीच्या गेट समोर पि.चिं.मनपा व एम.आय.डी. सी च्या दोन मोठ्या पाईप लाईन एकमेकांना चिकटून गेल्या आहेत.
तेथे गेल्या दोन महिन्यांपासून 3HP मोटरणे जेवडे पाणी सोडले जाते त्या पेक्षा पाणी वाया जात आहे गेल्या अनेक दिवसापासून याठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते.लाखो लिटर पाणी रात्रंदिवस वाया जाते.थरमॅक्स कंपनीतील कर्मचारी दशरथ शितोळे यांनी एम.आय.डी. सी व पालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार कल्पना दिली परंतु त्यांनीं दाद दिली नाही.
मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी एम.आय.डी. सी चे मुख्य कार्यकारी अभियंता कल्पेश लाहीवाल व मनपाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्याशी संपर्क साधला असता या दोघांनी पालिकेच्या वतीने रवी पवार व एम.आय.डी. सी च्या वतीने संतोष तावल यांच्या उपस्थितीत पाहणी केली.विद्युत वितरण कंपनीचा खांब असल्यामुळे तो काढल्याशिवाय खोदकाम करता येणार नाही म्हणून दोन्ही अधिकारी यांनी हात झटकले. शेवटी आम्ही म.रा.विद्युत वितरणाचे कार्यकारी अभियंता शेळके साहेब यांची भेट घेतली त्यांनी भोसरी येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता बी.बी.भरणे यांना खांब काढण्यासाठी पत्र देण्याचे सांगितले.त्यांनी पत्र दिल्यानंतर शेवटी विद्युत खांब निघाल्याशिवाय गळती थांबणार नाही हे निश्चित झाले.मी पाणी वाचवण्यासाठी पंधरा दिवसांपुर्वी पाणी वाचवा रॅलीद्वारे अभियान राबवून नागरीकांना पाणी बचतीचे आवाहान करीत असताना पिंपरी चिंचवड मनपा व एम, आय. डी. सी. जबाबदारीचे एकमेकाकडे बोट करत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर याठिकाणी लवकर पाणी गळती थांबवली नाही तर तेथे आम्ही पाणी गळती थांबावी म्हणून शहरातील सर्व नागरीकांना त्याठिकाणी उपस्थित राहाण्याचे आवहान करुन शहराचे महापौर व पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त यांच्या प्रतिमेची पुजा करुन पाणी गळती थांबवावी म्हणुन साकडे घालू असे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले.
यावेळी संस्था अध्यक्ष विकास कुचेकर,उपाध्यक्ष विकास शहाने,मुरलीधर दळवी,सौ.संगिता जोगदंड,ऍड.सचिन काळे उपस्थित होते.