पुणे-मिसेस वेस्ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०१९ – सीझन २ या सौंदर्य स्पर्धेची महाअंतिम फेरी नुकतीच हयात पुणे या हॉटेलमध्ये उत्साही वातावरणात आणि जल्लोषात संपन्न झाली. स्पर्धेचे यंदा दुसरे यशस्वी वर्ष असून अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या ३२ स्पर्धकांचे जीवन या स्पर्धेमुळे खरोखरच पालटून गेले. स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यांतून सौंदर्य़वतींची निवड करण्यात आली होती. या व्यासपीठाने महिला सक्षमीकरणाला खराखुरा अर्थ प्राप्त करुन देत सर्वसामान्य महिलांनाही त्यांच्यातील कला-गुण-बुद्धिमत्ता सादर करण्यासाठी एक मोठा मंच मिळवून दिला.
स्पर्धकांना तज्ज्ञांकडून पाच दिवस स्पर्धेच्या विविध पैलूंबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यात परिचय, व्हॉइस मॉड्युलेशन, स्टेज प्रेझेन्स, प्रश्नोत्तरे, रॅम्प वॉक यांचा समावेश होता. दिवा पेजंट्सचे तज्ज्ञ मार्गदर्शक कार्ल व अंजना मस्कारेन्हास यांनी या पैलूंमध्ये अधिक सुधारणा घडवून स्पर्धकांना घडवले.
परीक्षक मंडळात महेक चहल (अभिनेत्री), नयनी दिक्षीत (अभिनेत्री), शिबानी कश्यप (गायिका), राज कौशल (दिग्दर्शक), सुमीत कुमार (हयात पुणेचे सरव्यवस्थापक), विवेक मेंडोंसा (लॉरेन्स अँड मेयो), मोना बोरसे (क्वीन ऑफ द वर्ल्ड २०१९), नम्रता दुबे (मिसेस वेस्ट इंडिया २०१८) या नामवंतांचा समावेश होता.
प्रसिद्ध दूरचित्रवाणी अभिनेता अमन यतन वर्मा याने महाअंतिम फेरीचे सूत्रसंचालन शैलीदार आणि कुशलतेने करुन प्रेक्षकांना गुंगवून सोडले. शिबानी कश्यप हिने आपली लोकप्रिय गाणी सादर केली आणि दिवा स्पर्धेच्या माजी स्पर्धकांनी त्याला नृत्याची जोड दिली.
महाअंतिम फेरीतील स्पर्धकांनी मुकूट जिंकण्यासाठी आपली अजोड तयारी दाखवून देताना स्वतःमधील आत्मविश्वास आणि दिमाखाचेही उत्कृष्ट दर्शन घडवले. उपांत्य फेरीतील १६ स्पर्धकांतून सिल्व्हर (वय २० ते ३६) आणि गोल्ड (वय ३७ व पुढे) या दोन श्रेणींमध्ये केवळ ६ सर्वोत्तम स्पर्धकांची निवड करणे परीक्षकांनाही कठीण गेले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
शीर्षक विजेते :
मिसेस वेस्ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०१९ – सिल्व्हर : वार्तिका पाटील
मिसेस वेस्ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०१९ – गोल्ड : हेतल कास्लीवाल
फर्स्ट रनर अप – सिल्व्हर : सिंथीया फुर्टाडो
फर्स्ट रनर अप – गोल्ड : मंजू कटारिया
सेकंड रनर अप – सिल्व्हर – स्वाती गुंडावार
सेकंड रनर अप – गोल्ड – इरफाना शेख
पश्चिम भारतातून चार विभागीय क्वीन्सही निवडण्यात आल्या.
क्वीन ऑफ मुंबई – प्राची म्हात्रे
क्वीन ऑफ नाशिक – कुंदा शिंदे
क्वीन ऑफ नागपूर – प्रीती देशमुख
क्वीन ऑफ पुणे – मंजू नानकानी
विजेत्यांना मोदसूत्र, लॉरेन्स अँड मेयो, द टॅरट लेडी, स्किनवर्क्स व रॉयल ऑर्गेनिक यांच्याकडून दिमाखदार मुकूट, रोख पारितोषिके व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
समारंभाची ही शानदार सायंकाळ दिवाचे डेअर, ड्रीम, डॅझल हे बोधवाक्य सार्थ करणारी होती आणि त्याचसोबत ही स्पर्धाही पश्चिम भारतातील सर्वांत मोठ्या सौंदर्य़ स्पर्धांपैकी एक ठरली.