- जॉय बॅनर्जी, जयंत येवले, , मिलिंद घैसास यांना विजेतेपद
पुणे- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए-पीसीएलटीए वरिष्ठ मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 50वर्षावरील गटात निर्मल वाधवानी याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, जॉय बॅनर्जी, जयंत येवले, मिलिंद घैसास यांनी आपापल्या गटांतील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत 35 वर्षावरील गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित जॉय बॅनर्जी याने दहाव्या मानांकित संतोष दळवीचा 8-4 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. 45वर्षावरील गटात जयंत येवलेने मंदार मेहेंदळेचा 8-5 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. 55वर्षावरील गटात मिलिंद घैसास यांनी चारुदत्त साठेचा 8-3 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 50वर्षावरील गटात निर्मल वाधवानीने मनोज हार्डीकरचा 8-6 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. एकेरी गटाबरोबरच दुहेरीत निर्मल वाधवानीने राजेश मित्तलच्या साथीत मनोज हार्डीकर व गजानन कुलकर्णी यांचा 8-6 असा पराभव करून दुहेरी मुकुट पटकावला.
दुहेरीत अंतिम फेरीत 35वर्षावरील गटात शायनी बरेटो व विवेक खडगे यांनी जॉय बॅनर्जी व सुमंत पॉल यांचा 8-5 असा तर, 45वर्षावरील गटात सुनील लुल्ला व जयदीप वाकणकर या जोडीने राजेंद्र भोपळे व दत्तू शिंदे यांचा 8-5 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. 65वर्षावरील गटात विलास जावडेकर व हेमंत साठे यांनी सलीम वाडीवाला व राज भसीन यांचा 8-5 असा तर, 70वर्षावरील गटात यशवंत बावकर व शरद नाटेकर यांनी सुभाष सुतार व प्रदीप कुंचूर यांचा 8-5 असा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीसीएलटीएचे अध्यक्ष नंदकुमार रोकडे, डेक्कन जिमखाना क्लबचे सरचिटणीस विश्वास लोहकरे आणि क्रीडा व युवा संचालनालयचे सहसंचालक नरेंद्र सोपल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, पीएमडीटीएचे सहसचिव हिमांशू गोसावी, मंदार वाकणकर, अजय कामत आणि सुपरवायझर सुजन परब आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:एकेरी: अंतिम फेरी:
35वर्षावरील गट: जॉय बॅनर्जी(1) वि.वि.संतोष दळवी(10) 8-4;
45वर्षावरील गट: जयंत येवले वि.वि.मंदार मेहेंदळे 8-5;
50वर्षावरील गट: निर्मल वाधवानी वि.वि.मनोज हार्डीकर 8-6;
55वर्षावरील गट: मिलिंद घैसास वि.वि.चारुदत्त साठे 8-3;
दुहेरी:
35वर्षावरील गट:शायनी बरेटो/विवेक खडगे वि.वि.जॉय बॅनर्जी/सुमंत पॉल 8-5;
45वर्षावरील गट: सुनील लुल्ला/जयदीप वाकणकर वि.वि.राजेंद्र भोपळे/दत्तू शिंदे 8-5;
50वर्षावरील गट: राजेश मित्तल/निर्मल वाधवानी वि.वि.मनोज हार्डीकर/गजानन कुलकर्णी 8-6;
65वर्षावरील गट: विलास जावडेकर/हेमंत साठे वि.वि.सलीम वाडीवाला/राज भसीन 8-5;
70वर्षावरील गट: यशवंत बावकर/शरद नाटेकर वि.वि.सुभाष सुतार/प्रदीप कुंचूर 8-5.