पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात गणेश गायकवाड याने केलेल्या अष्टपैलू कमगिरीच्या जोरावर केडन्स संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. तर, दुसऱ्या सामन्यात यश माने(17-3 व 24-5) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने पूना क्लब संघाचा 7 गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात पहिल्या डावात केडन्स संघ 35 षटकात 5बाद 183धावा अशा सुस्थितीत होता. तत्पूर्वी काल क्लब ऑफ महाराष्ट्र संघ पहिल्यांदा खेळताना 30.3षटकात 116धावावर संपुष्टात आला. याच्या उत्तरात केडन्स संघाने 40 षटकात 5बाद 199धावा करून 83धावांची आघाडी घेतली. यात निखिल पराडकर 57, गणेश गायकवाड नाबाद 70, अथर्व धर्माधिकारी 20, हर्षद खडीवाले 14, अजित गव्हाणे नाबाद 22 यांनी धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. दुसऱ्या डावात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने 20षटकात 4बाद 135 धावा केल्या. पण त्यांचे 4 गडी बाद झाल्याने अंतिम धावसंख्या 115धावा(वजा20धावा) झा
पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर काल पूना क्लबला 38.3षटकात 163धावापर्यंत मजल मारता आली. पीवायसीचा आज 22षटकांपासून खेळ सुरु झाला. यात अभिषेक परमारने 115 चेंडूत 63धावा व दिव्यांग हिंगणेकरने 22धावा यांनी संघाला सुरेख सुरुवात करून दिली. पण दोघेही बाद झाल्यानंतर रोहन दामले 12, साहिल मदन नाबाद 37, योगेश चव्हाण नाबाद 21, साहिल छुरी 20 यांनी छोटी खेळी करत पीवायसीला 40 षटकात 9बाद 201 धावाचे लक्ष उभारून दिले. पण त्यांचे 9 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम धावसंख्या 156धावा(वजा45धावा) झाली व त्यामुळे पहिल्या डावात पुना क्लबने 7 धावांची नाममात्र आघाडी घेतली. दुसऱ्या डावात यश माने(24-5)याने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे पूना क्लबला 20षटकात 9बाद 121 धावाच करता आल्या. 9 गडी बाद झाल्याने पूना क्लबची धावसंख्या 76धावा(वजा 45धावा)झाली. पीवायसीकडून यश माने 24 धावात 5 गडी बाद करून पूना क्लबचा निम्मा संघ बाद केला. यशला दिव्यांग हिंगणेकरने 23धावात 2 गडी, तर प्रदीप दाढेने 14 धावात 1 गडी बाद केला. पीवायसीला विजयासाठी 83 धावांची गरज होती. यात दिव्यांग हिंगणेकरने 33 चेंडूत 8चौकार व 3षटकारांसह नाबाद 59 धावा, अभिषेक परमारने 14धावा, प्रीतम पाटीलने 15धावा करून संघाला सहज विजय मिळूवन दिला. सामन्याचा मानकरी यश माने ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 30.3षटकात सर्वबाद 116धावा(166-50धावा)(देवदत्त नातू 49(63,7×4), निकित धुमाळ 26(44), यश क्षीरसागर 25(40), नौशाद शेख 23(18), गणेश गायकवाड 4.3-20-3, सिद्देश वरगंटी 6-30-2, हर्षद खडीवाले 4-23-2, इझान सय्यद 6-45-2) वि.केडन्स: 40 षटकात 5बाद 199धावा(224-25धावा)(निखिल पराडकर 57(82,4×4) गणेश गायकवाड नाबाद 70(105,6×4), अथर्व धर्माधिकारी 20, हर्षद खडीवाले 14, अजित गव्हाणे नाबाद 22, नौशाद शेख 8-45-2, निकित धुमाळ 8-42-1, प्रज्वल गुंड 5-14-1, यश क्षीरसागर 6-33-1); पहिल्या डावात केडन्स संघाकडे 83धावांची आघाडी;
दुसरा डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 20षटकात 4बाद 115धावा(135-20धावा)(युवराज झगडे 35(31), यश क्षीरसागर नाबाद 29(44), देवदत्त नातू 22(26), नौशाद शेख 18, सुरज शिंदे 18, सिद्देश वरगंटी 4-26-1, हर्षद खडीवाले 2-17-1, अक्षय वाईकर 4-21-1, गणेश गायकवाड 4-19-1)पराभूत वि.केडन्स: 8.3षटकात 3बाद 35धावा(50-15धावा)(जय पांडे 21(32), अथर्व काळे नाबाद 14, निकित धुमाळ 3-14-2);सामनावीर-गणेश गायकवाड; केडन्स 7 गडी राखून विजयी;
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदान: पूना क्लब: 38.3षटकात सर्वबाद 163धावा(213-50धावा)(ऋषिकेश मोटकर 84(107,11×4), विश्वराज शिंदे 48(77,8×4), यश नाहर 30(34), प्रीतम पाटील 6-48-3, यश माने 3.3-17-3, रोहन दामले 8-41-2, दिव्यांग हिंगणेकर 7-47-2) वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 40 षटकात 9बाद 156धावा(201-45धावा)(अभिषेक परमार 63(115,7×4,1×6), दिव्यांग हिंगणेकर 22, रोहन दामले 12, साहिल मदन नाबाद 37, योगेश चव्हाण नाबाद 21, साहिल छुरी 20, आशिष सूर्यवंशी 7-37-1, दर्शित लुंकड 4-19-1, सौरभ यादव 8-35-1, विश्वराज शिंदे 5-23-2, ओंकार आखाडे 8-47-2); पहिल्या डावात पूना क्लबकडे 7 धावांची आघाडी;
दुसरा डाव: पूना क्लब: 20षटकात 9बाद 76धावा(121-45धावा)(यश नाहर 42(49,4×4,2×6), आशिष सूर्यवंशी नाबाद 18, दर्शित लुंकड 16, यश माने 4-24-5, दिव्यांग हिंगणेकर 3-23-2, प्रदीप दाढे 3-14-1)पराभूत वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 9.1षटकात 3बाद 85धावा(100-15धावा)(दिव्यांग हिंगणेकर नाबाद 59(33,8×4,3×6), अभिषेक परमार 14(24), प्रीतम पाटील 15, धनराज परदेशी 3-16-1, ओंकार आखाडे 3-40-1, आशिष सूर्यवंशी 2.1-33-1);सामनावीर-यश माने; पीवायसी 7 गडी राखून विजयी.
आगामी सामने: शुक्रवार 24 व शनिवार 25, 2019
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदान: डेक्कन जिमखाना वि.पूना क्लब