पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत प्लेट डिव्हिजन गटात महाराष्ट्र मंडळ, एसपी कॉलेज 1, लॉ कॉलेज लायन्स, पीसीएलटीए क्ले किंग्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पहिल्या सामन्यात महाराष्ट्र मंडळ संघाने पीवायसी ड संघाचा 23-12 असा पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्र मंडळ संघाकडून अभिषेक चव्हाण, राजेंद्र देशमुख, कमलेश शहा, विकास बचलू, संजय सेठी, अर्पित श्रॉफ यांनी अफलातून कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या सामन्यात आशिष डिके, मंदार मेहेंदळे, आदित्य जोशी, केदार पाटील, गजानन कुलकर्णी, उमेश भिडे, स्वेतल शाह, संतोष शाह यांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर एसपी कॉलेज 1 संघाने सोलारिस 2 संघाचा 24-06 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
अन्य लढतीत पीसीएलटीए क्ले किंग्स संघाने सोलारिस गो गेटर्स संघाचा 19-14 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: प्लेट डिव्हिजन:
महाराष्ट्र मंडळ वि.वि.पीवायसी ड 23-12(100अधिक गट: संजय सेठी/अर्जुन वाघमारे पराभूत वि.रणजित पांडे/संजय बोथरा (1)5-6; खुला गट: अभिषेक चव्हाण/राजेंद्र देशमुख वि.वि.केदार देशपांडे/प्रतीक वांगीकर 6-2; 90अधिक गट: कमलेश शहा/विकास बचलू वि.वि.संजू घोलप/तुषार नगरकर 6-3; खुला गट: संजय सेठी/अर्पित श्रॉफ वि.वि.रणजित पांडे/अमोल काणे 6-1);
एसपी कॉलेज 1 वि.वि.सोलारिस 2 24-06(100अधिक गट: आशिष डिके/मंदार मेहेंदळे वि.वि.डॉ. शिंदे/मनोज पालवे 6-0; खुला गट: आदित्य जोशी/केदार पाटील वि.वि.मनोज पालवे/अमित मते 6-0; 90अधिक गट: गजानन कुलकर्णी/उमेश भिडे वि.वि.राजू पिंपळे/बापू पायगुडे 6-2; खुला गट: स्वेतल शाह/संतोष शाह वि.वि.राजेंद्र देशमुख/संतोष दळवी 6-4);
लॉ कॉलेज लायन्स वि.वि.डेक्कन 3 23-12(100अधिक गट: श्रीकृष्णा पानसे/केतन जाठर वि.वि.हेमंत साठे/बाबू जाधव 6-0; खुला गट: अभिजित मराठे/शिवाजी यादव पराभूत वि.बाबू जाधव/धनंजय सुमंत (2)5-6; 90अधिक गट: राहुल पंढरपुरे/प्रोफेसर जयभाई वि.वि.मिलिंद लुंकड/किरण सोनावणे 6-3; खुला गट: केतन जाठर/तारख पारीख वि.वि.के जाधव/दत्तू शिंदे 6-3);
पीसीएलटीए क्ले किंग्स वि.वि.सोलारिस गो गेटर्स 19-14(100अधिक गट: विजय खन्ना/नंदू रोकडे वि.वि.वसंत साठे/हेमंत भोसले 6-0; खुला गट: नंदू रोकडे/प्रवीण घोडे पराभूत वि.रवींद्र पांडे/अमोल घोडे 1-6; 90अधिक गट: रवी जौकनी/निर्मल वाधवानी वि.वि.शिव जावडेकर/स्वरूप सवनूर 6-5(1); खुला गट: गिरीश कुलकर्णी/धर्मेश वाधवानी वि.वि.सिद्धांत गुणेश्वर/प्रसाद श्रीमनी 6-3).