पुणे- आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत इन्फोसिस संघाने यार्डी संघाचा १४०धावांनी पराभव करून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत इन्फोसिस संघाने प्रथम फलंदाजी करताना २०षटकात ४बाद २४३धावा केल्या. यात प्रभजोत मल्होत्रा ७१, संदीप शांघाई ६७, आशय पालकर नाबाद ५२, साईनाथ शिंदे ३१यांनी धावा काढून संघाला २४३ अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली. याच्या उत्तरात यार्डी संघाला २०षटकात ७बाद १०३धावापर्यंतच मजल मारता आली. पार्थ शहाच्या ४५धावा, गौतम तुळपुळेच्या २६धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. इन्फोसिसकडून भास्कर श्रीवास्तव(२-१७), रवी थापलियाल(२-२१), करण पांड्या(२-२४)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. सामन्याचा मानकरी संदीप शांघाई ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी:
इन्फोसिस: २०षटकात ४बाद २४३धावा(प्रभजोत मल्होत्रा ७१, संदीप शांघाई ६७, आशय पालकर नाबाद ५२, साईनाथ शिंदे ३१, प्रमोद दवंडे २-४१)वि.वि.यार्डी: २०षटकात ७बाद १०३धावा(पार्थ शहा ४५, गौतम तुळपुळे २६, भास्कर श्रीवास्तव २-१७, रवी थापलियाल २-२१, करण पांड्या २-२४);सामनावीर-संदीप शांघाई; इन्फोसिस १४०धावांनी विजयी.