पुणे: चॅम्प एन्ड्युरन्स टीम यांच्या तर्फे साई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शिर्डी स्पर्धेचे शिर्डी येथे 11फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन 3,5,10,21 व 42किलोमीटर प्रकारात होणार आहे.
स्पर्धेत एकूण 10लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहे. श्री साई बाबा हे सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असल्यामुळे शिर्डी हे अतिशय पवित्र असे तीर्थक्षेत्र बनले आहे. साई बाबांच्या समाधी वर्षाची यंदा शताब्दी साजरी होत असून या मॅरेथॉनच्या माध्यमातून श्रद्धा व सबुरी हा श्री साई बाबांचा संदेश सर्वदूर पसरविणायचा उद्देश आम्हाला साध्य करायचा आहे. तसेच भारताचे पहिले आर्यनमन सनदी अधिकारी कृष्णा प्रकाश (आयपीएस आयजी व्हीआयपी सेक्युरीटी)यांच्या स्वप्नातील मेकिंग इंडिया रन या भव्य मोहिमेचा प्रारंभ या मॅरेथॉनच्या माध्यमातून होत आहे. शिर्डी आणि संभोवतालच्या परिसरासाठी पर्यटन आणि सुविधा यांना प्रोत्साहन देण्यासाठीही या मॅरॅथॉनचा उपयोग होणार आहे.
मॅरेथॉन शर्यतीस व्दारावती भक्त निवास येथून प्रारंभ होणार असून काकडी गाव (एअरपोर्ट पोर्ट) येथे या शर्यती चा समारोप होणार आहे. या मॅरेथॉनचे वैशिष्ट म्हणजे सर्वाधिक अंतराची अनवाणी शर्यत असून याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली जाणार आहे आणि यासाठी नावनोंदणी मोफत असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, याशिवाय सहभागी स्पर्धकांना पदक, नाश्ता, टी-शर्ट, गुडी बॅग आणि टाईम बीब देण्यात येणार आहे. इच्छुकांनी नावनोंदणीसाठी या वेबसाईटवर संपर्क साधावा. स्पर्धेसाठी आतापर्यंत देशभरांतून 800हुन धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला असून कमीतकमी 15000हुन अधिक स्पर्धक व 15आंतरराष्ट्रीय इलाईट धावपटू सहभागी होण्याची आशा असल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेला माउंट एव्हरेस्ट सर करणा-या अपर्णा प्रभुदेसाई, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे ट्रेनर अमोद भाटे, चॅम्प एन्ड्युरन्सचे संचालक निखिल शहा, अरविंद बिजवे, रविंद्र वाणी, तसेच अनवाणी धावपटू प्रविण झेले आदी मान्यवर उपस्थित होते.