सनबर्न ला ही निर्बंध घाला- अन्यथा न्यायालयात: अमोल बालवडकर
पुणे-न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाबाबत घालून दिलेले निर्बंध ‘सनबर्न ‘ ला घालावेत अन्यथा याप्रकरणी उद्या पण न्यायालयात याचिका दाखल करू असा इशारा भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिला आहे .याप्रकरणी त्यांनी ग्रामीण पोलिसांना निवेदन सादर केले आहे .
कायदा व नियम सर्वांना सारखा आहे,दहिहंडी , गणेशोत्सव, शिवजयंती, नवरात्रि अशा सार्वजनिक उत्सवालाच कोर्टाचे निर्बंध पोलिस का लावतात ?.मग अशा पाश्चात्य संस्कृतीचे उदात्तीकरण का ?आवाजाचे निर्बंध,उंचीचे निर्बंध,दिवाळीत फटाके वाजवायला निर्बंध ,डाॅल्बी चे निर्बंध कोर्टाने दिले ते फक्त सार्वजनिक उत्सवांना नाहित , ते सर्व कार्यक्रमांना आहेत .
पोलिसांनी ते नियम सनबर्न ला पन पाळायला लावावेतअशी विनंती करणारे हे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे . जर पोलिसांनी यावर स्तवर कारवाई केली नाही तर आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे बालवडकर यांनी म्हटले आहे .