मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘न्यू इंडिया आर्मी’ संकेतस्थळाचे अनावरण
मुंबई-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज न्यू इंडिया आर्मीची अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या पुढाकाराने या संकेतस्थळाची निर्मिती झाली आहे. मुख्यमंत्री यांच्या निवास्थान वर्षा बंगल्यावर संपन्न झालेल्या या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र जनता पार्टीचे सरचिटणीस विजय पुराणिक, राज्य उपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा आणि काही प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासासाठी केलेल्या संकल्पातून न्यू इंडिया आर्मीची स्थापना करण्यात आली आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली, नव्या भारताचे स्वप्न पाहणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान समृद्ध असणारे सुशिक्षित तरुण स्वयंसेवक न्यू इंडिया आर्मीच्या माध्यमातून काम करणार आहे. या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणले कि, पंतप्रधान मोदींच्या नवीन भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ही संकेतस्थळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. मागील स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी देशाच्या समोर न्यू इंडियाची संकल्पना मांडली होती, त्यानुसार न्यू इंडिया आर्मी सुरू करण्यात आली आहे. विकासाच्या चळवळीला आणखी गती मिळावी म्हणून हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने न्यू इंडिया आर्मीमध्ये सामील होत आहेत. या उप्क्रमामध्ये सहभागी होण्यासाठी न्यू इंडिया आर्मीचे http://newindiaarmy.org/? lang=mr संकेतस्थालावर जाऊन आपल्याला नोंदणी करण्यात यावे.