महाराष्ट्र आंतरजिल्हा अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत आझम कॅम्पसच्या विद्यार्थिनींना सुवर्णपदक
पुणे :
महाराष्ट्र आंतरजिल्हा अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ गटात अनुक्रमे अलमास शेख (एम सी ई सोसायटीच्या अॅग्लो उर्दू बॉर्इज हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय) व उमरा शेख (एम. सी. एस. इंग्रजी माध्यम प्रशाला) या विजेतेपद मिळवून सुवर्णपदका च्या मानकरी ठरल्या आहेत.
अलमास शेख ने महिलांच्या 64 ते 69 किलोग्रॅम वरिष्ठ गटामध्ये सुवर् णपदक मिळवले. तर उमेरा शेख ने कनिष्ठ गटाच्या 69 ते 75 किलोग्रॅम गटामध्ये सुवर्णपदक मिळवले.
अलमास शेख एम सी ई सोसायटीच्या अॅग्लो उर्दू बॉर्इज हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात इ. 12 वी मध्ये शिकत आहे. उमेरा शेख एम. सी. एस. इंग्रजी माध्यम प्रशालेत इ 10 मध्ये शिकत आहे.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॅा. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम, मुख्याध्यापिका परवीन शेख व रब्बाब खान, आझम क्रीडा अकादमीचे संचालक गुलजार शेख, व्यवस्थापकीय मंडळाचे सर्व सदस्य, सर्व शिक्षकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
ही स्पर्धा नुकतीच नागपुरमध्ये झाली. अंतिम सामन्यामध्ये अलमास शेख ने मुंबर्इ शहर संघाच्या सिमरन चा पराभव केला. तसेच अंतिम सामन्यामध्ये उमेरा शेख ने अहमदनगर संघाच्या नेहा चा पराभव केला.