मुंबई -महाराष्ट्रातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी, त्यांच्यातून दर्जेदार अभिनेत्री घडवण्यासाठी “सकाळ माध्यम समूहा’तर्फे सोमवारी (ता.१५) मुंबईत पु.ना. गाडगीळ आणि सन्स पुरस्कृत “मिस महाराष्ट्र २०१८’ स्पर्धेची घोषणा करण्यात आली. मुंबई-पुण्यातील तरुणींना चित्रपटात काम करण्याची संधी मिळते; मात्र ग्रामीण महाराष्ट्रात किंबहुना आदिवासी भागातील तरुणींमध्ये गुणवत्ता असूनही त्यांना संधी मिळत नाही. सर्वांनाच मुंबई पुण्यात राहणे शक्य होत नसल्याने संधीला मुकावे लागते. आदिवासी भागातील तरुणींना अनेकदा भाषेची समस्या जाणवते; मात्र “सकाळ’च्या मिस महाराष्ट्र स्पर्धेत चित्रपट क्षेत्रातील मान्यवर तरुणींना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कलागुणांना आणि त्यांच्या भविष्यालाही आकार देतील .”मिस महाराष्ट्र’ स्पर्धेच्या जिल्हा स्तरावर ऑडिशन्स होणार असल्याने तालुक्यातील तरुणींनाही स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल.त्यातूनच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दर्जेदार अभिनयाची गुणवत्ता समोर येईल.
या स्पर्धांची नोंदणी १६ जानेवारी ते २६ जानेवारी या काळात केली जाइल. महाराट्रात 8 विविध केंद्रावर या स्पर्धेच्या ऑडिशन्स घेतल्या जातील. अंतिम ३२ तरुणींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येइल. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करण्याची संधीमिळणार आहे. अन्य स्पर्धांप्रमाणे केवळ सौंदर्याला नव्हे; तर तरुणींमधल्या कलागुणांना प्रकाशकोंदण मिळणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाचा हेतूही या स्पर्धेतून साध्य होईल मिस महाराष्ट्रच्या ऑडिश्न्स विविध ८ केंद्रांवर घेण्यात येतील. त्यातून अंतिम स्पर्धेसाठी ३२ स्पर्धकांची निवड केली जाइल. अंतिंम स्पर्धकांचे ट्रेनिंग आणि ग्रुमिंग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने होइल.
नोंदणी : १६ जानेवारी ते २६ जानेवारी २०१८
ऑडिशन्स तारिख व ठिकाण
१ फेब्रुवारी २०१८– मुंबई-ठाणे
२ फेब्रुवारी २०१८ सोलापूर
३ फेब्रुवारी २०१८– औरंगाबाद
४ फेब्रुवारी २०१८– नाशिक
५ फेब्रुवारी २०१८– नागपूर
६ फेब्रुवारी २०१८– कोल्हापूर
७ फेब्रुवारी २०१८– जळगाव
८ फेब्रुवारी २०१८– पुणे
ग्रुमिंग सेशन्स- १२ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०१८– पुणे
अंतिम फेरी- १७ फेब्रुवारी- ऍमनोरा टाउन सेंटर, मगरपट्टा सिटी, पुणे