पत्रकार रोहिदास विठ्ठल डोंगरे यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यात हळहळ
ओतुर –
एकीकडे सर्वत्र पत्रकार दिन साजरा होत असताना दुसरीकडे मात्र पत्रकार दिनाच्या दिवशीच पत्रकार रोहिदास विठ्ठल
डोंगरे यांचे ह्रुदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाल्याची घटना घडल्याने जुन्नर तालुक्यातून मात्र हळहळ व्यक्त होत आहे .
सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो पत्रकार दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच जुन्नर तालुक्यातील साळवाडी गावचे पत्रकार रोहिदास विठ्ठल डोंगरे यांच्यावर काळाने घाला घातला ते आपल्या काही मित्रांसमवेत आणे येथे सुरु असलेल्या रंगदास स्वामी उस्तवाच्या बातमीचे व्रुत्त संकलन करण्यासाठी गेले होते त्यानंतर सायंकाळी त्यांच्या छातीत दुखु लागल्याने त्यांना उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्यांचे निधन झाले लहाणपणीच वडीलांचे छत्र हरपल्यामुळे त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी होती ते फॅब्रीकेशनचा व्यवसाय सांभाळून पत्रकारिता करत होते ते सध्या दैनिक प्रभातमधुन बातमीदार म्हणून काम करत होते त्यांनी काही काळ दैनिक पुढारीमध्येही बातमीदार म्हणून काम केले आहे पत्रकार दिनाच्या दिवशीच त्यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे एक शांत संयमी आणि मनमिळाऊ मित्र हरपल्याची भावना पत्रकार मित्रांमधुन व्यक्त केली जात आहे त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी तांबेवाडी येथील वैकुंठभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती त्यांच्यामागे आई पत्नी व चार मुली असा परीवार आहे