पंकजा मुंडेंनी आपले वय ,अनुभव आणि बुद्धी चे भान ठेवावे – खा. वंदना चव्हाण
पुणे : पुण्यातील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामविकास व महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. ही टीका तथ्यहीन असून, अत्यंत खालच्या पातळीची व अशोभनीय आहे व महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही, अशी टीका पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष, खा. वंदना चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केली.
‘१९८४-८५ च्या लोकसभेत २ खासदारांपर्यंत रसातळाला गेलेल्या भाजपा सरकारच्या आजच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीची चिंता करू नये. शरद पवार यांची राजकीय व सामाजिक उंची समजण्या इतकी त्यांची बौद्धिक उंची नसल्यामुळे हे व असे वक्तव्य त्यांच्याकडून वारंवार होत असावे.
भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवार यांचे महत्व व देशाच्या राजकारणातील स्थान समजते, पण त्यांच्या नावावर निवडून आलेल्या पंकजा मुंडेना हे समजत नाही हे भारतीय जनता पार्टीचे दुर्दव आहे.
पंकजा मुंडेनी आपल्या वयाचे व अनुभवाचे भान ठेऊन बोलले पाहिजे. किमान आपले वडील (कै. गोपीनाथ मुंडे) यांच्या दुर्दवी मृत्यू झाल्यानंतर जी मदत शरद पवार यांनी केली याची तरी जाणीव त्यांनी मनात ठेवणे गरजेचे आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.
चिक्की घोटाळ्यात अडकलेल्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.