मुंबई वृत्तपत्र व वृत्तवाहिनी संघाची पुणे शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित…कार्याध्यक्ष पदी सुभाषचंद्र जाधव तर सेक्रेटरी पदी शाम राठी ….
पुणे- मुंबई वृत्तपत्र व वृत्तवाहिनी संघाच्या पुणे शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक संघटक संजय भोकरे आणि मुबई वृत्तपत्र वृत्तवाहिनी संघाचे कार्याध्यक्ष उमेश कुलकर्णी तसेच पुणे शहर आणि जिल्हा अध्यक्ष शरद लोणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येथे घोषित करण्यात आली .यावेळी प्रथम पत्रकार संघाचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय संजय दिनकर कुलकर्णी यांच्या जयंती निमित्त त्यांना पुष्पांजली वाहण्यात आली .या प्रसंगी संदीप भटेवरा हि उपस्थित होते. कार्यकारिणी पुढील प्रमाणे
कार्याध्यक्ष -सुभाषचंद्र जाधव,
सेक्रेटरी- शाम राठी ,
उपाध्यक्ष-हरीश शर्मा, विवेक तायड़े,
खजिनदार-राम झोंड,
सहचिटणीस -गौरव कुलकर्णी आणि शब्बीर मुजाहिद,
कार्यकारिणी सदस्य – नरेंद्र शिंदे, अनिल सोनपाटकी आणि अभिषेक अरुण लोणकर