चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांची भेट.
मुंबई-शिवसेना चित्रपट सेनेच्या वतीने चित्रपटातील कलाकारांना, रंगभूमी कलाकारांना आणि तंत्रज्ञ यांना हक्काची घरे द्यावी आणि त्यासाठी चित्रपट सेनेचे प्रमुख आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत बैठक लावावी अशी मागणी करणारे निवेदन म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांना चित्रपट सेनेचे सचिव संग्राम शिर्के , दिलीप दळवी गिरीश विचारे यांनी आज येथे दिले .
ह्या मागणी नुसार आदेश बांदेकर यांच्या समवेत शुक्रवार दिनांक १२ रोजी दुपारी १२वाजता ह्या बैठकीचे आयोजन केले असल्याचे म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले.