पुणे- ‘पोलीस लाईन ‘ चित्रपटातून पोलिसांच्या समस्या मांडू पाहणाऱ्या मराठी अभिनेता संतोष जुवेकर याला आता पोलिसी हिसक्या च्या विरोधात बोलण्याची वेळ आली आहे . काल पहाटे सहकारनगर पोलीस ठाण्यात खुद्द वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने त्याला जोरदार हिसका बसला आहे .
‘मी जर पुण्यातच नव्हतो … तर पुण्यातील अरण्येश्वर येथे दहीहंडी करणाऱ्या मंडळाने फोटो माझे लावले म्हणून माझ्यावर पोलीस गुन्हा कसा दाखल करू शकतात ..? असा प्रश्न करत मराठी अभिनेता संतोष जुवेकरने पुणे पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत .
माय मराठी ने ‘ संतोष जुवेकारांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बातमी प्रसिद्ध केल्यानंतर संतोष जुवेकर याने याबाबत ‘मायमराठी’ शी बोलताना पोलिसांच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला .
तो म्हणाला ‘ मी पुण्यात आलोच नव्हतो मी मुंबईत होतो . आणि मी पुण्यातील वाहतुकीला अडथळा केला ,ध्वनिप्रदूषण माझ्यामुळे झाले आदी जे असेल त्याबाबत माझ्यावर गुन्हा दाखल होतो म्हणजे आश्चर्यच आहे …अजबच काभार म्हणायचा पुणे पोलिसांचा …
दरम्यान याप्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणीक म्हणाले ,संतोष जुवेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे .याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे .मात्र संतोष जुवेकर तिथे होता किंवा नाही याबाबत अजून खातरजमा व्हायची आहे . ज्यांनी फिर्याद दाखल केली ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेवाळे यांनी मात्र ‘मी मिटिंगमध्ये आहे .गुन्हा दाखल आहे .अन्य माहिती पोलीस ठाण्यातून घ्या असे सांगितले .तर पोलीस ठाण्यातून संतोष जुवेकरयाच्यासह अन्य लोकांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती देत अधिक माहितीसाठी संबधित पीआय यांचे नंबर देण्यात आले .