दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलतर्फे सातार्यामध्ये यकृत (लिव्हर ) संबंधी जनजागृती अभियान आणि शिबिर
सातारा :
‘दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’च्या वतीने सातार्यामध्ये यकृत (लिव्हर) संबंधित जनजागृती अभियानातंर्गत शिबीर, वैद्यकिय तपासणी आणि तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ‘दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर’, ‘मल्टीऑर्गन ट्रान्सप्लान्ट विभाग’ (लिव्हर, किडणी, पॅनक्रियास्) आणि ‘हार्टलाईन डायग्नोस्टिक सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले गेले आहे.
‘हार्टलाईन डायग्नोस्टिक सेंटर’, उत्तेकरनगर, संजीवन हॉस्पिटल मागे, सदर बाजार, सातारा येथे शनिवार, दिनांक 22 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत शिबिर होणार आहे, अशी माहिती डॉ. निनाद देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिली.
सर्व वयोगटांकरीता आणि सवलतीच्या दरात आयोजित या जनजागृती अभियान आणि शिबिरामध्ये डॉ. निनाद देशमुख, डॉ. वृषाली पाटील, डॉ. विष्णू बिरादार आणि डॉ. सचिन पळणीटकर हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरातंर्गत हेपॅटायटीस तपासणी, हेपॅटायटीस सी व बी आणि लिव्हर फंक्शन तपासणी सवलतीच्या दरात केली जाणार आहे. ज्या रूग्णांना लिव्हर आजारांसंबंधीत प्रश्न आहेत, ज्यांना कावीळ, हेपॅटायटीस, लिव्हरची गाठ, लिव्हर सिर्हॉसीस, सतत रक्त द्यावे लागणे, डायलिसीस अशा प्रकारच्या व्याधी आहेत अशा रूग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
—————————— —————
नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :
गणेश गायकवाड – 02162-232363 / 9850244795, मृदुला नावलीकर – (020) 49153030 (लिव्हर हेल्प लाईन)