किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (केव्हीआयएफएफ) द्वारा ‘वेंगुर्ला मॉडेल’च्या यशस्वी कथेवर लघुपट.
पुणे-
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा (केव्हीआयएफएफ) एकमात्र पर्यावरणीय महोत्सव आहे, पर्यावरणावर आधारित चित्रपट स्क्रीनिंगसारखे विशेष आयोजन केव्हीायएफएफ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर करतो. या वर्षी केव्हीआयएफएफ ने एक शॉर्ट फिल्म “वन झीरो झीरो” निर्माण केली आहे.
ही शॉर्ट फिल्म रामदास कोकरे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेला पुढाकार आणि त्यांना मिळालेल्या यशावर आधारित आहे.आज १४ नोहेंबर रोजी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रामदास कोकरे यांच्या ह्या लघुपटाचे अनावरण करण्यात आले.
केव्हीआयएफएफ मागील वर्षीपासून पर्यावरण संरक्षणासारख्या क्रियाकलापांवर काम करणार्या लोकांच्या यशस्वी कथांवर छोट्या लघुपटांचे निर्माण करत आहे, जेणेकरूण सामान्य लोकांमध्ये देखील पर्यावरणाविषय जागरुकता निर्माण होईल.
पर्यावरण, वन्यजीवन, ऊर्जा, वायू आणि पाण्याशी संबंधित विषयांचे विश्लेषण करण्यासाठीचा केव्हीआयएफएफचा हा एक अभिनव प्रयत्न आहे. या विषयात विशेष रुची असणार्या सर्व सदस्यांना ते एका व्यासपीठावर आणतात आणि प्रकृतीस संरक्षित करण्यासाठी मिळुण प्रयत्न करतात.
दापोली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रामदास कोकरे यांनी वर्ष २०१० मध्ये दापोलीस पुर्णपणे प्लास्टिक मुक्त केले होते, नंतर त्यांनी किर्लोस्कर वसुंधरा अंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सवापासून प्रेरित होऊन वेंगुर्ला, औरंगाबाद, माथेरान आणि कर्जत मध्ये “शुन्य कचरा अभियान” (प्लास्टिक मुक्त गाव अभियान) सफलतापूर्वक लागू केला. यासाठी त्यांना राष्ट्रीय-अंतर्राष्ट्रीय स्तरावरील बरेचसे पुरस्कार देखील मिळाले आहेत.