पुणे: वाढत्या वयासोबत जवळजवळ प्रत्येक व्यकयीमध्ये मूत्रमार्गाच्या कोणत्याना कोणत्या त्रासाची लक्षणे आढळून येतात. यामध्ये मुख्यता वारंवार लघवी येणे, रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला त्रास होणे, लघवी पूर्ण होत नसल्याची जाणीव होणे व लघवीचा प्रवाह घटणे ही लक्षणे आढळून येतात. प्रोस्टेटची वाढ होणे हा एक वृद्धत्वाच्या वाटचालीतील एक भाग आहे व प्रत्येकालाच तेथोड्या फार प्रमाणात होते.
जेव्हा प्रोस्टेटची वाढ होते तेव्हा मूत्र मार्ग सर्व बाजूंनी संकुचित होतोव वरील लक्षणे आढळून येतात. प्रत्येकालाच शस्त्रक्रियेची गरज असेलच असे नाही. केवळ ज्यांनी औषधोपचाराला व जीवन शैलीच्या अपायांना योग्य प्रतिसाद दिला नाही त्यांनाच शस्त्रक्रिया करावे लागते. ५ ते ६ % पुरुषांमध्ये प्रोस्टेटची वाढ कर्करोगामुळे होऊ शकते.
कर्करोगाच्या प्रारंभिक टप्प्यातील लक्षणे देखील वरील नमूद केलेल्या लक्षणांसारखेच आहेत. (वारंवार लघवी येणे, रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला त्रास होणे, लघवी पूर्ण होत नसल्याची जाणीव होणे व लघवीचा प्रवाह घटणे). कॅन्सरच्या पूढील टप्यात हाडांमध्ये वेदना होणे, भूक कमी होणे याबरोबरच फ्रॅक्चर आणि अर्धांगवायूचा धोका देखील संभावतो.
इंडियन नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीनुसार प्रॉस्टेट कॅन्सर बाधित पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने 50 वर्षे वयानंतरच्या पुरुषांमध्ये हा कॅन्सर आढळतो. हा कॅन्सर जगभरातील पुरुषांच्या मृत्युचे दुसरे प्रमुख कारण ठरला आहे. आणि दुर्देवाची बाब म्हणजे प्रत्येक सहावा पुरुष प्रोस्टेट कॅन्सर बाधीत आहे. आज जगभरातील विकसीत देशांमध्ये डिजिटल एक्झामिनेशन (बोटाद्वारे गुद्वारतुन) आणि पीएसएच्या माध्यमातून कॅन्सरबद्दल जागरूकता होत आहे. मात्र भारतात प्रोस्टेट कॅन्सरबाबत आज देखील तितकीशी जागरूकता नाही.
जवळपास 60 टक्के रुग्ण डॉक्टरला भेटतात जेव्हा ते शेवटच्या टप्यावर पोहचलेले असतात. यासाठी इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सर (IPC) मागील ५ वर्षांपासून प्रोस्टेट कॅन्सर आणि त्याचे निदान करण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागकृता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी 120 पेक्षा अधिक शिबीरांच्या माध्यमातून 40,000 पेक्षा जास्त लोकांची जनजागृती करण्यात आली.
कॅन्सरची प्राथमिक लक्षणे
भविष्यात प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी 50 वर्षांपूढील पुरूषांनी पीएसए आणि डीआरई तपासणी करण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट फॉर प्रॉस्टेट कॅन्सरने दिला असून कोणत्याही प्रकारच्या पाठदूखीकडे दुर्लक्ष करू नये असे देखील सुचवले आहे. पूर्व निदान माध्यमातून प्रोस्टेट कॅन्सर असल्याचे कळाले तर बायोअप्सी करणे गरजेचे असते. बायोअप्सी ही एक साधी, सरळ पद्धत असून ही अल्ट्रासाउंड मशीनच्या मदतीने केली जाते. टीआरयुएस (ट्रान्स रेक्ट अल्ट्रासाउंड) च्या मदतीने केली जाणारी बायोअप्सी आदर्श बायोअप्सी समजली जाते. प्रॉस्टेट कॅन्सरच्या अचकू निदानासाठी जवळपास
12 ते 14 तुकडे टिश्यूजची अत्यंत पद्धतशीरपणे तपासणी करावी लागते. आणि एमआरआयद्वारे कॅन्सरचा अधिक अचूक निदान होऊ शकते. जर वेळेत निदान झाले तर हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. विशेषत: 50 वर्षे वयानंतर कोणत्याही पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. हे मोफत शिबीर ८ जानेवारी ते १७ जानेवारी २०१८, पूर्व नियोजीत वेळेनुसार इन्स्टिट्यूट ऑफ प्रोस्टेट कॅन्सर, पुणे येथे घेण्यात येणार आहे.