पुणे : श्री शिवसाई प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा ‘महर्षी धोंडो केशव कर्वे समाजभूषण पुरस्कार’ अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव व जिजामाता हायस्कुलच्या माजी मुख्याध्यापिका प्रमिला गायकवाड यांना, तर वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा ‘डॉ. आयडा स्कडर कार्यभूषण पुरस्कार’ ऍक्युपंक्चर स्पेशालिस्ट डॉ. सुमिता सातारकर यांना जाहीर झाला आहे.
येत्या रविवारी (दि. २५ ऑगस्ट २०१९) दुपारी १२ वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून, पुणे शहर महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शलाका पाटील आणि इलेक्टॉहोमिओपँथी तज्ञ प्रतिमा सिंग या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत. तर महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुमिता सातारकर यांनी जपान, चीन आणि अमेरिका या देशात जाऊन एक्यूपंक्चरवर पीएचडी केली आहे. आजवर त्यांनी ८५०० पेक्षा अधिक लोकांना व्याधीमुक्त केले आहे.