पुणे:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा ऑगस्ट/सप्टेंबर 2018 मध्ये इंग्रजी 30 व 40 श.प्र.मि या विषयाची परीक्षा 18 ते 24 ऑगस्ट 2018 या कालावधीत तसेच मराठी व हिंदी 30 व 40 श.प्र.मि या विषयाची परीक्षा 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2018 या कालावधीत राज्यातील एकूण 304 केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल 23 ऑक्टोबर 2018 रोजी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकांची ऑनलाईन प्रिंट घेता येईल.
विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रे/गुणपत्रके व निकालाच्या प्रती सर्व जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी, (माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) व मुंबईसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, बालभवन, चर्नी रोड, मुंबई यांचे कार्यालयामार्फत संबंधित संगणक टंकलेखन संस्थामधून कार्यालयीन वेळेत मिळतील.
निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून 10 दिवसांत परीक्षार्थीने गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेतून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रु 100/- व उत्तरपत्रिका छायाप्रती मिळण्यासाठी प्रति विषय रु. 400/- ऑनलाईन पध्दतीने बँक ऑफ इंडियाच्या (BOI) खाते क्र. 050010210000035 IFSC code- BKID0000500 वर संस्था Login 1 नोव्हेंबर 2018 पर्यंत सादर करावेत. याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत, असे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी कळविले आहे.