पुणे,- सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येते की विलंब शुल्कानंतरची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे स्वहस्ताक्षरात भरुन त्यावर विद्यार्थी व प्राचार्य यांच्या स्वाक्षरीसह पुढील तारखांप्रमाणे व शुल्काप्रमाणे विभागीय मंडळात सादर करावयावी.
फेब्रुवारी व मार्च -2017 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) ची आवेदन पत्रे अतिविलंब शुल्कासह दाखल करण्याची अंतिम मुदत, रुपये 50/- प्रतिदिन प्रतीविद्यार्थीप्रमाणे 8 डिसेंबर, 2016 ते 8 जानेवारी, 2017 पर्यत स्विकारण्यात येतील.
विशेष अतिविलंब शुल्कासह रुपये 100/- प्रतिदिनी प्रतीविद्यार्थीप्रमाणे रविवार, 8 ते 23 जानेवारी, 2017 दरम्यान आवेदन पत्रे स्विकारण्यात येतील. अतिविशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत रुपये 200/- प्रतिदिनी प्रतीविद्यार्थीप्रमाणे 24 जानेवारी, 2017 ते 7 फेब्रुवारी, 2017 पर्यत आवेदन पत्र स्विकारण्यात येतील. सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांनी उपरोक्त तारखांनुसार व शुल्कानुसार कार्यवाही करण्यात यावी. तसेच विभागीय मंडळ निश्चित करेल त्याच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यास परीक्षा द्यावी लागेल. विद्यार्थ्याचा निकाल इतर विद्यार्थ्याबरोबर जाहीर होऊ शकला नाही तर विद्यार्थी त्यास हरकत घेऊ शकणार नाही असे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून घेण्यात यावे. मंडळाकडे विद्यार्थ्याकडून परस्पर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.तसेच ही बाब विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी असे मंडळाचे विभागीय सचिवांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.