पुणे जिल्हयातील विकासासाठी सुमारे 30 कोटींचे सामंजस्य करार- पालकमंत्री गिरीश बापट
मुंबई: पुणे जिल्हयातील आरोग्य, वाहतूक, शिक्षण, यांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी देशातील नामवंत प्रसिध्द कंपन्या व सेवाभावी संस्था यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे या संदर्भातील सामंजस्य करार मुंबई येथे करण्यात आला आहे. अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
पुणे जिल्हयातील वाढती लोकसंख्येनुसार आवश्यक असणाऱ्या सर्व आरोग्य सेवा, शिक्षण, वाहतूक, पर्यावरण याबाबतचे प्रश्न सोडविण्या साठी शासकीय यंत्रणेला सहयोग व्हावा यासाठी डॉ. आनंद बंग यांच्या पुढाकाराने या क्षेत्रात काम करणाऱ्यासंस्था व कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे. यामध्ये लिपिन फाऊंडेशन ग्रामीण भागाच्या विकासासाठी, बॉश कंपनी वाहतुक शिक्षणासाठी पार्क ची निर्मीती करणे,टाटा ट्रस्ट पोषण आहाराबाबत, रूबल नागी फाऊंडेशन मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, पिरामल ही कंपनी आरोग्यासेवा पुरविणे मर्सडीज बेंझ या कंपनी सोबत जिल्हा परिषदेतील मुलांना टॉयलेट उभारण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. नॅचरल कॉन्झरवेशन ही वॉटर प्रोजेक्टसाठी काम करणे तर डॉ. सुयोग सोमकुवार, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत सोनोग्राफी सेंटर सुरू करणे, सलाम बॉम्बे ही संस्थेसोबत 10 हजार मुलांना कला कौशल्ये शिकविणे संदर्भात सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
या करारात जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालीका तसेच जिल्हा परिषद पुणे यांचा समावेश आहे. या वेळी पुण्याचे पालकमंत्री व अन्न नागरी मंत्री गिरीश बापट, डॉ. आनंद बंग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालीका यांचे अधिकारी, कंपन्यांचे अधिकारी तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकरी उपस्थित होते.