पुणे–आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची आज (रविवार) आठवी यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेसने महाराष्ट्रात आणखी चार उमेदवारांची घोषणा केली असून हिंगोलीतून सुभाष वानखेडे, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर, रामटेकमधून किशोर गजभिये तर अकोल्यातून हिदायत पटेल या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.आठव्या यादीतही पुण्याच्या उमेदवाराचे नाव नव्हते .यामुळे कॉंग्रेस पुण्यातील मराठा आणि बहुजन समाजाचा विचार महत्वाचा मानून भाजपच्या उमेदवाराचा सामना करायला धक्का तंत्र अवलंबणार काय याची शंका व्यक्त करणारी चर्चा पुण्यात सुरु झाली . एकीकडे कार्यकर्त्यांचा जोश आणि हिम्मत खच्ची होऊ नये म्हणून पक्षाने आज कॉंग्रेस भवनात कार्यकर्त्यांचा मेळा घेवून प्रत्येक विधानसभा मतदार संघात प्रचाराची धुरा सोपविणारी नावे जाहीर केलीत .कॉंग्रेसचे मोहन जोशी ,अरविंद शिंदे हे दोन इच्छुक उमेदवार या मेळाव्यात उपस्थित राहिले .आज तरी नावे जाहीर होईल अशी अपेक्षा येथे खुद्द रत्नाकर महाजन यांनीही व्यक्त केली असताना सायंकाळी हि यादी आली त्यात हि पुण्याच्या उमेदवाराचे नाव नव्हते यामुळे बाहेरील नेत्यांच्या नावांचा धक्का तर बसणार नाही .. अशी शंका घेत अखेरीस पक्षातील तिघांपैकी एक नाव येईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती . कार्यकर्ते दिल्ली च्या संदेशाकडे डोळे लावून बसलेट असे चित्र आहे .
दरम्यान हिंगोलीचे विद्यमान खासदार राजीव सातव आणि मुकुल वासनिक हे निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर चंद्रपूरमध्ये विनायक बंगाडेऐवजी सुरेश धानोरकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा यापूर्वी केली होती. त्यानंतर आज पक्षाने नववी यादी जाहीर केली. यामध्ये चंद्रपूर येथून विनायक बंगाडेऐवजी सुरेश धनोरकर तर हिंगोलीतून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने देशभरातील १० लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. यापूर्वी चंद्रपूर मतदारसंघातून विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु, नव्या यादीत त्यांची उमेदवारी रद्द केली असून त्यांच्याजागी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले सुरेश धानोरकर यांना या मतदारसंघातून उमदेवारी देण्यात आली आहे. धानोरकर हे भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना लढत देतील.