पुणे- बंद झालेल्या हजार पाचशेच्या नोटा म्हणजे काळे धन ३० टक्के कमिशन ने बदलून व्हाईट करून देण्याच्या प्रयत्नातील तब्बल 1 कोटी 11 लाख 46 हजार रुपयांची रक्कम पुणे पोलिसांनी पकडली . पुण्यातील शिवाजीनगर परिसरात कार्पोरेशन जवळील नाकोडा कोर्ट इमारत येथे ही आज दुपारी २ वाजता कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले कि , अंकेश अनंत अगरवाल(रा. खडकी ) हा आपल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी किशोर शशमल पोरवाल यांच्या ऑफिस मध्ये येणार असल्याची माहिती हवालदार शैलेश जगताप यांना मिळाली होती . सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले, पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या पथकाने त्यानुसार संबंधित ठिकाणी छापा टाकूनहि रक्कम ताब्यात घेवून कारवाई केली .पुढील कार्यवाही साठी याबाबतची माहिती आणि रक्कम पोलिसांनी आयकर विभागाच्या अधिका-यांकडे सुपूर्त केली आहे