सांगली – : जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीला महापुर आल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पूरग्रस्त भागामध्ये लोक मद्यपान करुन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा तसेच आपत्कालीन परिस्थितीचा विचार करुन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी एकूण 43 भागातील/गावातील सर्व प्रकारच्या किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या (सीएल-3, एफएल -2, एफएल -3, एफएलबीआर-2, टिडी-1, फॉर्म-ई, फॉर्म ई-2) मध्य विक्रीसाठी दिनांक 07 ऑगस्ट ते 08 ऑगस्ट 2019 या कालावधीकरिता मुंबई दारुबंदी कायदा – 1949 मधील कलम 142 (1) अन्वेय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार मद्य विक्री अनुज्ञप्त्या मद्य विक्रीसाठी बंद करण्यात आलेल्या ठिकाणे / गावे पुढीलप्रमाणे – शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यातील गावे- वाळवा, बोरगांव, ताकारी, रेठरे, ऐतवडे, शिगांव, सागाव, मणदूर, कोकरुड, चरण, बिळाशी, मांगले, पलुस, भिलवडी, पुणदी, आमणापूर, नागठाणे, अंकलखोप व आरळा तसेच सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका व मिरज तालुका हद्दितील ठिकाणे – कोल्हापूर रोड, गावभाग, हरिपूर रोड, वखारभाग, एसटी स्टँड परिसर, पटेल चौक, जामवाडी, गवळी गल्ली, सांगलीवाडी, अंकली, धामणी रोड, शास्त्री चौक, जुना बुधगाव रोड, शामरावनगर, 100 फुटी रोड, धामणी रोड, पद्माळे, कर्नाळ रोड, मारुती रोड, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज रोड, शास्त्री चौक मिरज, कृष्णा घाट परिसर मिरज व म्हैशाळ.
या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
–