पुणे-एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे गेल्या ३ वर्षापूर्वी मणक्याच्या आजाराने अंथरुणाला खिळलेले होते त्यानंतर त्यांनी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उद्योग जगतात झेप घेतली. एक तरुण उद्योजक म्हणून ओळखले जाणारे एव्हरेस्टवीर व आंतरराष्ट्रीय दर्जाचे बिजनेस कोच आनंद बनसोडे यांचा सेमिनार पुणे येथे आयोजित केला गेला आहे. पुण्यातील पदमजी हॉल, टिळक रोड येथे ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ४ तासांचे हे सेमिनार आयोजित केले गेले आहे.
तरुण उद्योजकांनी नक्की आयुष्यात ध्येय ठेवून कसे मार्गक्रमण केले पाहिजे?, बिजनेस सेटबॅकला कसे सामोरे गेले पाहिजे, एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी नक्की कोणत्या मानसिकतेची गरज असते , असे अनेक विषय या सेमिनार मध्ये घेतले जाणार आहे.
सेमिनारमध्ये काय शिकाल-
– तुमच्या “बिजनेस बिलिफ सिस्टीम” वर काम करून त्याद्वारे अपेक्षित यश कसे मिळवले पाहिजे.
– तुमचे नकारात्मक “मेंटल ब्लॉक” काढून त्याद्वारे सर्वोच्च सकारात्मक आयुष्य कसे जगावे.
– बिजनेस मार्केटिंग, सेल्स ग्रोथ आणि नेटवर्क बिल्डींगसाठी वापरण्यात येणाऱ्या क्लुप्त्या.
– “आकर्षणाचा नियम” व “विपुलतेचा नियम” यांचा योग्य पद्धतीने वापर व त्याद्वारे तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात लिमिटलेस यश कसे मिळवता येते.
– Output based Meditation आणि त्याचा बिजनेस ग्रोथ मध्ये होणारा उपयोग.
– आंतरराष्ट्रीय स्तरावरील बिजनेस सिस्टीम जी तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या बिजनेसमध्ये वाढ करेल.
एव्हरेस्टवीर व बिजनेस कोच आनंद बनसोडे यांचे सेमिनार येत्या काळात पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरांमध्ये आयोजित केले जाणार असून हे सेमिनार पूर्णपणे फ्री असणार आहे. या सेमिनार ला उपस्थित राहण्यासाठी 9067045500 / 9067035500 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन “द लिमिटलेस यु” या कंपनीमार्फत केले गेले आहे.