-भारतातील विद्यार्थी व स्वीडनमधील डिझाइनर्स यांच्या उत्पादनांचा प्रदर्शनात समावेश –
-19 शाश्वत नावीन्यपूर्ण उत्पादने दर्शवली जाणार –
– शि .प्र .मंडळीच्या प्रिन. एल. एन. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड
रिसर्चच्या (WeSchool) विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शाश्वत भारतीय डिझाइनचे प्रदर्शन करणार –
मुंबई: स्वीडनच्या मुंबईतील राजदूतांनी शि .प्र .मंडळीच्या प्रिन. एल. एन. वेलिंगकर
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चच्या (WeSchool) सहयोगाने उंग स्वेन्स्क फॉर्म डिझाइन
प्रदर्शनाचे आज मुंबईमध्ये उद्घाटन केले.
या प्रकल्पाची निर्मिती ज्ञान वाढवण्याच्या आणि नव्या, नावीन्यपूर्ण डिझाइनच्या व्याप्तीमध्ये विस्तार
करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे; जेणे करून त्यास नव्या रसिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
प्रोत्साहन देईल आणि बदल घडवण्याची इच्छा निर्माण करेल अशी ताकद व ऊर्जा या प्रदर्शनामध्ये आहे.
त्यामध्ये नव्या स्वीडिश डिझाइनमधील सध्याचे ट्रेंड उत्कृष्ट कलाकुसर व नव्या स्वरूपातील अभिव्यक्ती
याद्वारे व्यक्त केले आहेत. या प्रदर्शनाचे आयोजन स्वेन्स्क फॉर्मने (स्वीडिश सोसायटी ऑफ क्राफ्ट्स अँड
डिझाइन) आर्कदेस, आयकिया, सिटी ऑफ मालमो व स्टॉकहोम फर्निचर अँड लाइट फेअरच्या सहयोगाने केले
आहे. शाश्वतता व सर्क्युलर इकॉनॉमी ही प्रदर्शनाची मुख्य संकल्पना आहे.
हे प्रदर्शन विशेषतः आशियाची सफर करत आहे आणि भारतात येण्यापूर्वी ते हाँगकाँग व सिउल येथे जाऊन
आले आहे आणि त्याचा देशातील पुढचा थांबा सुंदर मुंबई शहरातील शि .प्र .मंडळीच्या प्रिन. एल. एन.
वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चच्या (WeSchool) हा आहे.
19 अद्ययावत डिझाइनची उदाहरणे प्रदर्शित करणाऱ्या आजच्या प्रदर्शनामध्ये, निरनिराळ्या कला स्वरूपांमध्ये
मटेरिअल रिसर्च, क्रॉस-ओव्हर क्रफ्ट व सर्वसामान्य गोष्टींच्या ओळखीचा पेच इथपासून आधुनिक डिझाइनमध्ये
शाश्वततेतील वाढती रुची व मानवी संवाद दर्शवला आहे. इमेजेस ते उत्पादने, पुनःप्रक्रिया केलेल्या वस्तू व
माटग्रंट क्रायसिसशी संबंधित युनिसेक्स फॅशनपर्यंत – प्रदर्शनामध्ये शाश्वतता व सर्क्युलर इकॉनॉमी या व्यापक
संकल्पनेंतर्गत विविध विषयांचा समावेश केला आहे.
याव्यतिरिक्त, वुईस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या दोन निवडक गटांनी स्वीडिश डिझानरबरोबरच आपलीही शाश्वत
डिझाइन दर्शवली आहेत. दर्शवण्यात आलेले पहिले डिझाइन सोलार फाउंटन हे असून ते दोन एकर जमिनीचा
वापर करून 1 मेगावॅट उर्जेची निर्मिती करते. साधारणतः 1 मेगावॅट उर्जेची निर्मिती करण्यासाठी चार एकर
जमिनीची गरज असते – त्यामुळे या शाश्वत डिझाइनने जमिनीचा वापर 50%नी कमी केला आहे. दुसरे
डिझाइन व्हर्टिकल फार्मिंग मॉडेलचे आहे. कसण्यायोग्य जमीन दुर्मिळ किंवा अनुपलब्ध असलेल्या आव्हानात्मक
स्थितीमध्ये अन्नधानाची निर्मिती करण्याचा प्रयत्न हे डिझाइन करते. यामध्ये वापरलेली पद्धत
स्कायस्क्रॅपरसारखी डिझाइन व शेतीच्या पद्धतींचा वापर करून डोंगराळ भागातील शहरे, वाळवंट व शहरे यांना
विविध प्रकारची फळे व भाज्या यांचे उत्पादन घेण्यासाठी मदत करते. या पद्धतीचा अवलंब केल्यास
आपल्याला 95% अधिक पाण्याची बचत करता येईल, उत्पन्नात वाढ होईल, वाहतुकीचा खर्च कमी होईल व
मर्यादित जमिनीच्या प्रश्नावर मात करता येईल.
सौंदर्यशास्त्र व पारंपरिक पद्धती यांना आव्हान देणारा विविधता हा स्वीडिश डिझाइनचा महत्त्वाचा घटक आहे.
स्वीडनची शाश्वत डिझाइन विचारसरणी कोणतीही तडजोड न करता, पर्यावरण व ऑक्युपंटचे आरोग्य
यांच्यावरील नकारात्मक परिणाम कमी करेल अशा निर्णयांना डिझाइन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यात उत्तेजन देते.
हा एकात्मिक, सर्वांगीण दृष्टिकोन असून तो आपल्याला पर्यावरणपूरक वागण्यासाठी प्रोत्साहन देतो.
स्वीडनने हवामानातील बदलांच्या प्रश्नाला गांभीर्याने हात घातला आहे आणि देशातील ग्रीनहाउस गॅस
उत्सर्जनामध्ये घट करण्यासाठी लक्षणीय मदत केली जात आहे. हवामानातील बदलांविषयी कायदा राबवणारा
स्वीडन हा पहिला देश आहे. भविष्यातील पिढ्यांनी सन 2045 पर्यंत शून्य CO2 उत्सर्जन करणे व 2030
पर्यंत जीवाश्म-मुक्त समाज निर्माण करणे अनिवार्य आहे. शाश्वत व्यवस्थेचे उपाय निर्माण करण्याच्या बाबतीत
स्वीडन 1970 पासून आघाडीवर आहे: सेंट्रल हीटिंग, डिस्ट्रिक्ट हीटिंग, ग्रीन बिल्डिंग्स, पाणी व हवा यावरील
प्रक्रिया आणि ई-व्हेइकल्स. तेथील 50% वीजपुरवठा अपारंपरिक पद्धतीने केला जातो व 99% कचऱ्याचा
उर्जेसाठी किंवा पुनर्वापर केला जातो. केवळ 1% लँडफिल्समध्ये वापरला जातो.
प्रदर्शनामध्ये टेसा मारीज गेझ व एमेली होक्स या आंतरराष्ट्रीय डिझाइनर्सनी “शाश्वततेविषयीचे सध्याचे
स्वीडिश ट्रेंड” या विषयावर व्याख्यान घेतले. यासाठी प्रकल्पाशी संबंधित असलेले स्वीडन व भारतातील विविध
घटक, डिझाइनर, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती व विद्यार्थी आणि बिगर-सरकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डिझाइन प्रदर्शनाचा भाग म्हणून, शिक्षणतज्ज्ञ, डिझाइनर, भारतीय व स्वीडिश कंपन्या आणि डिझाइनचे
विद्यार्थी यांचा “बाजारांमध्ये परिवर्तन आणण्यासाठी व्यवसायामध्ये शाश्वततेचा समावेश करणे” या विषयावर
परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
आपल्या डिझाइनविषयी बोलताना आर्टिस्ट टेसा मारीज गेझ म्हणाल्या, “मनुष्य व उत्पादन यांच्यातील
भावनिक नाते शोधण्याचा प्रयत्न मी माझ्या कामातून करते. आपण ज्या प्रकारे उपभोग घेतो तो निरोगी नाही
व त्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. माझ्या दृष्टीने, शाश्वतता म्हणजे केवळ सर्क्युलर मॉडेलसाठी काम करणे
इतकेच नाही; तर व्यक्ती व त्यांच्या आजूबाजूचा परिसर यांच्यातील नाते योग्य राखणेही गरजेचे आहे. आपण
पर्यावरणाशी ज्या प्रकारे जोडलेलो आहोत त्यामध्ये बदल करणे व लोक व उत्पादन यांच्यामध्ये भावनिक,
टिकाऊ नाते निर्माण करणे आवश्यक आहे.”
कलेमागील प्रोत्साहनाविषयी बोलताना डिझाइनर एमेली होक्स म्हणाल्या,;माझ्या दृष्टीने, डिझाइनचा अर्थ
नेहमीच कृतीद्वारे साहित्य, पद्धती व शिक्षण यांचा वेध घेणे हा राहिला आहे. कृतीचा परिणाम दिसून येतो.
वस्तूंतील अर्थ व मूल्य यांना प्रश्न करून मी त्यांची निर्मिती करण्याचे नवनवे मार्ग शोधते. भविष्यामध्ये
आपल्याला कशाला तोंड द्यावे लागणार आहे ते आपल्याला माहीत नाही आणि आपल्याकडे त्याची कोणतीही
उत्तरे नाहीत, पण आपण आतापासून काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करणे गरजेचे आहे. पृथ्वीसाठी अनुकूल
ठरेल असे डिझाइन तयार करून शाश्वत भविष्य घडवण्याच्या शक्यतांचा शोध मला घ्यायचा आहे."
कार्यक्रमात बोलताना स्वीडिश काउन्सिल निल्स एलीसन यांनी सांगितले कि “डिझाइन हे केवळ सौंदर्यशास्त्र नाही. हे
व्यावहारिक दृष्टीकोनातून त्याचा योग्यप्रमाणे उपयोग, अनुभवात वैविध्यपूर्णता आणि जीवन गुणवत्ता समृद्ध
करण्याविषयी आहे. या प्रदर्शनात हवामानातील बदलांसारख्या जागतिक आव्हानांचे महत्व आणि हा परिपत्रक
जैवअर्थव्यवस्था आणि टिकाऊपणाच्या फायद्यांवर प्रकाश टाकण्यावर भर देण्यात आला आहे."
कार्यक्रमाविषयी बोलताना देताना वेलिंगकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट चे समूह संचालक प्रो डॉ उदय साळुंखे
म्हणाले, “भारताशी मैत्रीच्या संबंधांना चालना देईल अशा उपक्रमासाठी स्वीडनशी सहयोग करणे वुईस्कूलसाठी
अभिमानास्पद आहे. ज्ञानाच्या देवाण-घेवाणीसाठी लिनेअस-पाल्मे शिष्यवृत्तीसारख्या कार्यक्रमांसाठी मालार्देलेन
युनिव्हर्सिटीशी केलेल्या सहयोगामुळे व वुईस्कूल येथे स्वीडनच्या राजदुतांनी व स्वीडिश संस्थेने 'डिझाइन
फॉर डिग्निटी' नावाच्या स्वीडिश डिझाइन प्रदर्शनाचे व 'अॅक्सेस अॅबिलिटी' फोटो प्रदर्शनाचे आयोजन केल्याने
भारतय व स्वीडिश व्यक्तींसाठी समावेशक प्रगतीसाठी समान संधी निर्माण झाल्या आहेत. भारतीय
संस्कृतीमध्ये शाश्वततेचे मूल्य खोलवर रुजलेले आहे. योग व आयुर्वेद या नैसर्गिक बलांना भारतीय
संस्कृतीमध्ये दिलेल्या महत्त्वाने जगभरातील लोकांना पृथ्वीचे महत्त्व जाणण्यास प्रवृत्त केले आहे. डिजिटल
विश्वामध्ये शाश्वततेला अधोरेखित करण्यासाठी स्वीडन व भारताने स्वीडिश डिझाइन प्रदर्शनाच्या माध्यमातून
जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. मूर्त कलेद्वारे निर्माण केलेले इलस्ट्रेशन अबालवृद्धांना चकित करणारे आहे."
प्रदर्शन निर्वाण रूम, चौथा मजला, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे मार्च 12, 2018 – मार्च 25,
2018, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत सर्वांसाठी मोफत खुले आहे.
प्रदर्शन रविवारी, मार्च 25 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत पुन्हा खुले असेल.
वुईस्कूलविषयी
भारतातील आघाडीच्या बिझनेस स्कूलमध्ये वुईस्कूल ही जागतिक नेतृत्व घडवण्याचे उद्दिष्ट व दूरदृष्टी यांना
आकार देण्यासाठी डिझाइन-प्रणित नावीन्यपूर्ण व्यवस्थापन शिक्षणावर भर देणारी प्रवर्तक व्यवस्थापन शिक्षण
संस्था आहे. वुईस्कूल ‘नेतृत्व’ व ‘नावीन्य’ यांची सांगड घालते आणि समस्या सोडवण्यासाठी योग्य धोरणात्मक
दृष्टिकोन अवलंबून, सामाजिक-आर्थिक- राजकीय बाबतीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण दृष्टिकोन विकसित करते.
डिझाइन व नावीन्य हा गाभा असलेल्या वुईस्कूलचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी जीवनातील सर्व पैलूंमध्ये उत्कृष्ट
असावे व त्यांनी ग्लोबल सिटिझन लीडर व्हावे म्हणून नवनवे पर्याय उपलब्ध करणे हा असतो.
‘बेस्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्री लिंकेज’, 2015 हा सीआयआय-एआयसीटीई राष्ट्रीय पुरस्कार
वुईस्कूलला देण्यात आला. तसेच, या वर्षी असोचेम नववे हायर एज्युकेशन समिट, नॅशनल एक्सलन्स पुरस्कार
असलेला “बेस्ट इनोव्हेटिव्ह इन्स्टिट्यूट” पुरस्कार केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री प्रा. डॉ. राम शंकर
कथेरिया यांच्या हस्ते वुईस्कूलला देण्यात आला. बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनने (बीएमए) रतन टाटा यांच्या
हस्ते वुईस्कूलचा बेस्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ द इयरने गौरव केला. वुईस्कूलने एमआयटी मीडिया लॅब,
स्टॅन्फर्ड डिझाइन स्कूल, आयडीईओ व सेंटर फॉर क्रिएटिव्ह लीडरशिप यांच्याशी भागीदारी केली आहे.
वुईस्कूलने विविध क्षेत्रांमध्ये जगभरातील आघाडीच्या अनेक विद्यापीठांशी भागीदारी केली आहे.