मुंबई -सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी कारकिर्दीमध्ये ३०० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. खासकरून शोले चित्रपटामध्ये त्यांनी केलेली कालियाची भूमिका आणि ‘सरदार मैंने आपका नमक खाया है’, हा डायलॉग प्रेक्षकांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या विशेष लक्षात राहिला. अंदाज अपना अपना या आमिर खान आणि सलमान खानच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमातली त्यांची रॉबर्ट ही भूमिका देखील विशेष गाजली. त्यांच्या निधनावर सिनेसृष्टीमधून शोक व्यक्त केला जात आहे.
विजू खोटे यांचा अल्पपरिचय.
जन्म. १७ डिसेंबर १९४१
विजू खोटे हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. आता वाढत्या वयामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीतील काम कमी केले होते. विजू खोटे यांनी नायकाच्या भूमिकेपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली असली, तरी देखील पुढे त्यांनी छोट्या परंतु स्मरणात राहतील अशा भूमिका साकारल्या. ‘या मालक’ या १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. गेल्या ५५ वर्षांपासून त्यांनी सिनेसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या. अशी ही बनवाबनवी या चित्रपटात त्यांनी बाली नावाची खलनायकाची व्यक्तिरेखा साकारली होती. विजू खोटे यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात भूमिका केल्या असल्या तरी ते त्यांच्या “शोले” चित्रपटातील कालियाच्या भूमिकेसाठी ओळखल्या जात असत. कालियाचा “सरदार, मैंने आपका नमक खाया है” हा संवाद आता ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सोबतच त्यांची “अंदाज अपना अपना” या चित्रपटातील रॉबर्ट या भूमिकेतील “गलती से मिस्टेक हो गया” हा संवाद खुप लोकप्रिय झाला होता.