“श्री दीपलक्ष्मी इंटरनॅशनल ‘ चे लॉस एंजेलिस मध्ये प्रकाशन
“श्री दीपलक्ष्मी इंटरनॅशनल ‘ चे लॉस एंजेलिस मध्ये प्रकाशन
पुणे :
श्री दीपलक्ष्मी इंटरनॅशनल या अंकाचे प्रकाशन अलीकडेच लॉस एंजेलिस ‘ येथे झाले . बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनानिमित्त हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे हे 17 वे अधिवेशन “लॉस एंजेलिस’ येथे झाले.
1993 पासून 22 वर्षे श्री दीपलक्ष्मी अमेरिकेतील या मराठमोळ्या सांस्कृतिक उत्सवात सहभागी झाले आहे आणि विशेषांक प्रकाशित करीत आले आहे.५८ वर्षांपासून श्री दीपलक्ष्मी प्रकाशित होत असून बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनानिमित्त विशेषांक प्रकाशित करण्याची ही दहावी वेळ आहे . ‘
यावेळच्या श्री दीपलक्ष्मी इंटरनॅशनलची संकल्पना “मराठीचा जागर’ आणि “आठवणींचा महासागर’ अशी आहे. “मातृभूमीकडून मातृभाषिकांकडे’ दिलेला हा अक्षरठेवा आहे ‘ , असे संपादक हेमंत रायकर यांनी सांगितले.
अमेरिकेतील भारतीय वंशाचे राजकारणी बॉबी जिंदल, दुबई चे मसाला किंग धनंजय दातार यांचा तसेच कीर्तनकार ऍना, बेस्टर सेलर लेखक अच्युत गोडबोले यांचा परिचय या विशेषांकात आहे. शरद पवार आणि स्व . गोपीनाथ मुंडे यांनी अनुक्रमे “पहिली सायकल’, “मौजमजेचे दिवस’ या विषयांवर आठवणी लिहिल्या आहेत. “अमेरिकेतील प्रवचने’ हा रश्मी कुलकर्णी यांचा ललित लेख आहे, तर दादर शिवाजी मंदिरचे चित्रण कमलाकर नाडकर्णी यांनी केले आहे. आनंद गुप्ते यांनी “गोष्ट अवधूत गुप्ते’ची रंगवली आहे.
या अंकाचे अमेरिकेतील मराठी बांधवानी चांगले स्वागत केल्याचे हेमंत रायकर यांनी सांगितले . अधिक माहितीसाठी संपर्क : 9867126196