अमेरिकन कॉन्स्युलेट च्या वतीने ‘इफेक्टिव्ह डिजिटल स्टोरी टेलिंग ‘ विषयावर एक दिवसीय कार्यशाळा
पुणे :अमेरिकन कॉन्स्युलेट च्या वतीने ‘इफेक्टिव्ह डिजिटल स्टोरी टेलिंग’ विषयावर शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांसाठी एक दिवसीय कार्यशाळेंचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा १७ मे रोजी पुण्यात होईल. बहुमाध्यम (मल्टी मीडिया) तज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण दिगंबर दामले मार्गदर्शन करतील. बाळकृष्ण दामले यांनी कम्युनिकेशन टेकनॉलिजिमध्ये एम. एस. (अमेरिका) केले आहे. ते ‘फुलबब्राइट स्कॉलर’ असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधील ‘एज्युकेशनल मल्टिमीडिया रिसर्च सेंटर’ मध्ये कार्यरत आहेत .
शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचे सोशल मीडिया विषयक काम करणाऱ्यांना या प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित राहता येईल . कार्यशाळा विनामूल्य आहे.
नाव नोंदणी आवश्यक असून, अधिक माहिती साठी MumbaiIEA@state.gov या ई-मेल आयडी वर संपर्क साधू शकता तसेच दूरध्वनीवर ११ मे पर्यंत नावनोंदणी करता येईल . प्रत्येक संस्थेतील २ जणांना प्रवेश दिला जाईल. प्रत्येक सहभागींना प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. कार्यशाळेला येताना लॅपटॉप घेऊन यावे लागणार आहे.