न्युरोफिडबॅक चिकित्सेवर मोफत निदान मार्गदर्शन शिबीर
पुणे : ‘ब्रेनमॅ्पींग इंडिया फोरम क्लिनिक’ च्या वतीने आयोजित शिबिरात अतिचंचलता (एडीएचडी), फिट येणे, फेफरे येणे (एपिलेप्सी), एकाग्रता शीघ्र संतापी, मतिमंदता अभ्यासात अडचणी येणार्या रुग्णांना मोफत मार्गदर्शन व निदान केले जाणार आहे. न्युरोफिडबँक चिकित्सेच्या माध्यमातून ही तपासणी होणार आहे.
शिबीर दुपारी २.०० ते सायंकाळी ७.०० यावेळेत औंध येथील ‘ब्रेनमॅ्रपींग इंडिया फोरम क्लिनिक’ १०१ वेस्टऍन्ड मॉलसमोर, स्टोलर एनक्लेव्ह, औध येथे आयोजित केले आहे. बुधवार दि. १ मे ते शुक्रवार दि. १० मे २०१९ दरम्यान हे शिबीर होणार आहे.
शिबिरामध्ये ब्रेन फिजिओलॉजिस्ट व न्युरो फिडबॅक फिजिअशन डॉ. प्रशांत देशमुख मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिरात येणार्या रुग्णांना सवलतीच्या दरात औषध उपचार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे रुग्णांना औषध उपचार करताना QEEG ब्रेन मॅपींग चाचणी आवश्यक आहे.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून, 9823832444 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले आहे.
न्युरोफिडबॅक चिकित्से विषयी अधिक माहिती :
न्युरोफिडबॅक चिकित्सा (टेस्ट) हानीविरहित पूर्णतः विना वेदनादायी असून, औषधीमुळे दुष्परिणाम होत नाही. ब्रेन न्यूरो फिजिओलॉजी या तंत्रज्ञानाने ऍटिझम, निद्रानाश, चिंतारोग, डिप्रेशन, औषध किंवा मादक पदार्थाचे व्यसन, ट्रॉमा ब्रेन इन्जुरी (मेंदूची दुखापत), धमन्यांची वेदना कमी करता येते. साधारणतः आत्तापर्यंत ब्रेनमॅपींग इंडिया फोरम क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. तर सुमारे ३० टक्के रुग्णांना औषधामुळे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.