ऋतुजा जोगदंड ची अंतर भारतीय नेटबाँल संघात निवड
पुणे-नवी सांगवी येथील कु.ऋतूजा जोगदंड हि मॉडर्न महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून तिनें पूणे जिल्हा स्तरीय खेळली होती .त्यानंतर तिची नगर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेतही तिची निवड झाली, होती .त्यानंतर निवडी चे पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील नाशिक, येवला,राजगुरूनगर, पुणे,अकोले, पिंपरी चिंचवड, विविध महाविद्यालयाच्या प्राचार्य यांना देण्यात आले. यावेळी राज्यातील विविध.महाविद्यालयातून 12 विद्यार्थ्यांनीची निवड करण्यात आली.आकुर्डी येथील प्रा रामकृष्ण मोरे या महाविद्यालयाची कू विशाखा पलांडे या विद्यार्थिनी पण या संघात निवड झाली आहे.फेब्रुवारीत चेन्नईत 20 ते 23 तारखेला होणाऱ्या स्पर्धेत देशपातळीवर ऋतुजा जोगदंड खेळणार आहे. कोणत्याही प्रकारची घरामध्ये क्रिडा वातावरण नसताना तिची निवड झाल्याने प्राचार्य डॉ. राजेंद्र झुझाराव व तिचे वडील मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड व अध्यक्ष विकास कूचेकर यांनी तिचे कौतुक केले. तिला क्रिडा शिक्षक विक्रम फाले यांचे बहूमोल मार्गदर्शन मिळाले. तिचे आतराष्टी्य पातळीवर खेळण्याचे स्वप्नं आहे असे तीने यावेळी सांगितले.