पुणे-‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन’ने (एसआयएमएमसी) आपल्या ‘पीजीडीएम’ अभ्यासक्रमाच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यास दौऱ्याचा भाग म्हणून माध्यमे व मनोरंजन उद्योग कसे काम करतो, याची माहिती करुन देण्यासाठी जगातील सर्वांत मोठ्या चित्रपट स्टुडिओंपैकी असलेल्या ‘रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद’ला रंजक व अनुभव समृद्ध करणारी सहल नुकतीच आयोजित केली. या भेटीतील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे गाजलेल्या ऐतिहासिक ‘बाहुबली’ चित्रपटाचे प्रचंड देखावे (सेट्स). या भेटीमुळे विद्यार्थ्यांना आयुष्यभरासाठी अविस्मरणीय असा अनुभव मिळाला.
“आभासी ज्ञानाचा वापर वास्तव-जीवनातील प्रसंगांमध्ये होणे, ही काळाची गरज असून तो कसा करावा, हेसुद्धा या अभ्यास दौऱ्यातून विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले आणि त्यांची आत्मविश्वास पातळी उंचावली”, अशी प्रतिक्रिया ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे अध्यक्ष डॉ. प्रा. संजय चोरडिया यांनी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांनी ओपन एअर व्हिंटेज रेड टुर बसमधून विविध सेट्स व चित्रण स्थळांना भेट दिली, मॅजिक शो, लाईव्ह शो व रामोजी शो अशा कार्यक्रमांचा, तसेच वाईल्ड वेस्ट स्टंट शॉट्स बघण्याचा थरार लुटला. त्यांनी बर्ड पार्कला भेट देऊन विविध रंगीबेरंगी व खास सुंदर पक्षी बघितले, तर बटरफ्लाय पार्कमध्ये आकर्षक फुलपाखरांचे सौंदर्य टिपले. पुढे बोन्साय गार्डनमध्ये जाऊन तेथील दुर्मीळ फुले बघितली आणि नैसर्गिक सुगंधाची अनुभूती घेतली.
सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी रामोजी फिल्म सिटीमधील ‘साहस ॲडव्हेंचर आऊट बाऊंड ट्रेनिंग प्रोग्रॅम’मध्ये अत्यंत उत्साह व जोमाने भाग घेतला. त्याचबरोबर सँड व्हॉली बॉल, ह्युमन फूस बॉल, हाय रोप कोर्स, नेट कोर्स, मेल्ट डाऊन, आर्चरी अशा खेळांचाही आनंद लुटला. एकंदरीत हा दौरा म्हणजे मौजपूर्ण आणि अविस्मरणीय अनुभव ठरला.