सातव्या पुणे-गोवा 645कि.मी.डेक्कन क्लिफहँगर सायकल शर्यत
पुणे,दि.8 नोव्हेंबर 2019: सातव्या पुणे-गोवा 645कि.मी.डेक्कन क्लिफहँगर सायकल शर्यत स्पर्धेत वैयक्तिक(सोलो)गटात 37 सायकलपटूंसह, सांघिक प्रकारात 32 क्लबने आपला सहभाग नोंदविला आहे. ही सायकल शर्यत शनिवार, दि.9 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होणार आहे.
स्पर्धेच्या संचालिका आणि फ्रांसमधील 1200कि.मी.शर्यतीस पात्र ठरलेल्या पहिल्या भारतीय महिला आणि अल्ट्रा सायकलिस्ट दिव्या ताटे यांनी सांगितले की, भारतांतील अल्ट्रा सायकलींसाठी प्रसिध्द असलेले पुणे येथे यावर्षी आयोजित या स्पर्धेत हैद्राबाद, गोवा, मैसूर, नवी दिल्ली, मुंबई, लातुर, बीड, नाशिक येथुन 350 सायकलपटू सहभागी झाले आहेत.
ही स्पर्धा वैयक्तिक(सोलो गट) आणि सांघिक गट(रिले टीम फॉरमॅट)या दोन प्रकारांत पार पडणार आहे. या स्पर्धेतील वैयक्तिक गटातील विजेता स्पर्धक रेस अॅक्रॉस अमेरिका(रॅम)या जगातील आव्हानात्मक सायकल शर्यतीसाठी पात्र ठरणार आहे. या सायकल शर्यतीमध्ये स्पर्धकांसमोर 32 तासात 643कि.मी.अंतर पूर्ण करण्याचे आव्हान असते. रेस अॅक्रॉस अमेरिका(रॅम)ही 5000 कि.मी. अंतराचा टप्पा असलेली अल्ट्रा सायकल शर्यत असून उत्तर अमेरिका खंड, कॅलिफोर्निया येथील समुद्रापासून ते वॉशिंग्टन डी.सी अशी सायकल शर्यत असते. रॅम शर्यतीमध्ये सोलो रायडर्सला 12 दिवसांत ही शर्यत पूर्ण करावी लागत असून यामध्ये दिवसाला 450 ते 600कि.मी अंतर पूर्ण करावे लागत असल्याचे ताटे यांनी नमुद केले. या वर्षी स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे पुण्यातील राजलक्ष्मी तेली, प्रियांका पवार, नेहा टिकम व मुंबईच्या स्वाती सबलोक या चार महिला रेस अॅक्रॉस अमेरिका(रॅम) स्पर्धेतसाच्या पात्रतेसाठी प्रयत्न करणार आहेत