पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरीज मानांकन टेनिस 2019 स्पर्धेत तेज ओक, श्रावणी देशमुख, सार्थ बनसोडे व सिमरन छेत्री यांनी आपापल्या गटांतील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
डेक्कन जिमखाना क्लब येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगर मानांकीत तेज ओक याने अव्वल मानांकीत अव्दिक नाटेकरचा 4-1, 4-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. तेज हा सिम्बायोसिस स्कुल येथे सहावी इयत्तेत शिकत असून, बाऊंस टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तर, मुलींच्या गटात बिगर मानांकीत श्रावणी देशमुखने दुस-या मानांकीत काव्या देशमुखचा 4-0, 4-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. श्रावणी ही सिंहगड स्प्रिंगडेल स्कुल येथे आठवी इयत्तेत शिकते.
14वर्षाखालील मुलांच्या गटात चौथ्या मानांकीत सार्थ बनसोडेने सहाव्या मानांकीत पार्थ देवरूखकरचा 4-1, 3-5, 4-0 असा तीन सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. सार्थ पी.जोग इंग्लिश मिडियम स्कुल येथे नववी इयत्तेत शिकतो. पाचव्या मानांकीत सिमरन छेत्रीने श्रावणी देशमुखचा 4-2, 4-0 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. सिमरन ही दिल्ली पब्लिक स्कुल येथे आठवी इयत्तेत शिकत असून गुरू टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक पवन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे वर्षातील या गटातील दुसरे विजेतेपद आहे.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी- 12 वर्षाखालील मुले
तेज ओक वि.वि निव गोगीया 7-0;
अव्दिक नाटेकर(1) वि.वि अर्जुन किर्तने(3)7-4;
अंतिम फेरी- तेज ओक वि.वि अव्दिक नाटेकर(1) 4-1, 4-1;
उपांत्य फेरी- 12 वर्षाखालील मुली
श्रावणी देशमुख वि.वि क्षिरीन वाकलकर (1) 7-1;
काव्या देशमुख(2) वि.वि रितिका मोरे 7-6(4);
अंतिम फेरी- श्रावणी देशमुख वि.वि काव्या देशमुख(2)4-0, 4-1
उपांत्य फेरी- 14वर्षाखालील मुले
सार्थ बनसोडे(4) वि.वि अनमोल नागपुरे (2) 7-4;
पार्थ देवरूखकर(6) वि.वि आर्यन हुड (3) 7-5;
अंतिम फेरी- सार्थ बनसोडे(4) वि.वि पार्थ देवरूखकर(6) 4-1, 3-5, 4-0;
उपांत्य फेरी- 14वर्षाखालील मुली
श्रावणी देशमुख वि.वि चिन्मयी बागवे (1) 7-6(6);
सिमरन छेत्री(5) वि.वि अलिना शेख (4) 7-4;
अंतिम फेरी-सिमरन छेत्री(5) वि.वि श्रावणी देशमुख 4-2, 4-0.