पुणे, दि. 5 सप्टेंबर 2019- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित सातव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत अर्बन रेवन्स, पेलिकन स्मॅशर्स आणि द ईगल्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सलामीच्या लढतीत अर्बन रेवन्स संघाने इम्पेरियल स्वान्स संघाचा 4-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून आनंद शहा, गिरीश मुजुमदार, श्रीदत्त शानबाग, विवेक जोशी, देवेंद्र राठी, रोहित भालेराव, केदार नाडगोंडे, संग्राम पाटील यांनी अफलातून कामगिरी केली.
दुस-या लढतीत पेलिकन स्मॅशर्स संघाने स्कॅवेंजर्स संघाचा 4-3 असा पराभव करत विजयी सलामी दिली. पेलिकन स्मॅशर्स संघाकडून सचिन जोशी, विवेक लिमये, सचिन अभ्यंकर, नितल शहा, प्रथम वाणी व सिध्दार्थ साठे यांनी सुरेख कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. तिसऱ्या लढतीत चेतन वोरा, तेजस चितळे, बिपीन चोभे, बिपीन देव, विमल हंसराज, शिवकुमार जावडेकर, आर्य देवधर, देवेंद्र चितळे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर द ईगल्स संघाने फाल्कन्स संघाचा 4-3 असा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली.
स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव आनंद परांजपे आणि ट्रूस्पेसचे मालक आश्विन त्रिमल व उल्हास त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, सारंग लागू, अभिषेक ताम्हाणे, रणजित पांडे, गिरीश करंबेळकर, विनायक द्रविड, देवेंद्र चितळे, तुषार नगरकर, अभिजीत खानविलकर आणि कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते. सिद्धार्थ निवसरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
अर्बन रेवन्स वि.वि.इम्पेरियल स्वान्स 4-3(गोल्ड खुला दुहेरी गट: अद्वैत जोशी/अजिंक्य मुठे पराभूत वि.मिहीर केळकर/तेजस किंजिवडेकर 12-21, 17-21; सिल्वर खुला दुहेरी गट : आनंद शहा/गिरीश मुजुमदार वि.वि.प्रिती फडके/विक्रम ओगले 21-15, 21-08; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट: अनिकेत शिंदे/सारा नवरे पराभूत वि.अनिश राणे/आदिती रोडे 06-21, 21-19, 16-21; वाईजमॅन : श्रीदत्त शानबाग/विवेक जोशी वि.वि.हेमंत पाळंदे/संदीप साठे 21-10, 21-12; सिल्वर मिश्र दुहेरी गट:अनिकेत सहस्रबुद्धे/प्रांजली नाडगोंडे पराभूत वि.ईशान भाले/केदार देशपांडे 13-15, 15-14, 11-15; सिल्वर खुला दुहेरी गट:देवेंद्र राठी/रोहित भालेराव वि.वि.विनायक भिडे/विश्वेश कट्क्कर 15-10, 15-07; गोल्ड खुला दुहेरी गट: केदार नाडगोंडे/संग्राम पाटील वि.वि. आदित्य काळे/तुषार नगरकर 21-12, 21-19);
पेलिकन स्मॅशर्स वि.वि स्कॅवेंजर्स 4-3( गोल्ड खुला दुहेरी गट: हर्षद बर्वे/प्रतिक धर्माधिकारी पुढे चाल वि अतुल बिनिवाले/मकरंद चितळे 0-1;सिल्वर खुला दुहेरी गट : भाग्यश्री देशपांडे/दत्ता देशपांडे पराभूत वि अभिजीत राजवाडे/अनिश रुईकर 06-21, 10-21; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट: हर्षद बर्वे/चैत्राली नवरे पराभूत वि तन्मय चोभे/शताक्षी किनिकर 13-21, 11-21; वाईजमॅन : सचिन जोशी/विवेक लिमये वि.वि रमन जैन/विरल देसाई21-06, 21-00; सिल्वर मिश्र दुहेरी गट: सचिन अभ्यंकर/नितल शहा वि.वि मनिष शहा/अमोल दामले 15-08, 12-15, 15-14; सिल्वर खुला दुहेरी गट: अंकुश मोघे/मिथाली कुलकर्णी पराभूत वि कविता रानडे/तन्मय चितळे 11-15, 12-15; गोल्ड खुला दुहेरी गट: प्रथम वाणी/सिध्दार्थ साठ्ये वि.वि अमित देवधर/मिहिर विंझे 21-20, 16-21, 21-17);
द ईगल्स वि.वि फाल्कन्स 4-3( गोल्ड खुला दुहेरी गट: चेतन वोरा/ तेजस चितळे वि.वि आनंद घाटे/राजशेखर करमरकर 21-14, 21-15; सिल्वर खुला दुहेरी गट : बिपीन चोभे/बिपीन देव वि.वि मधुर इंगळालीकर/मंदार विंझे 21-06, 21-13; गोल्ड खुला मिश्र दुहेरी अनिरूध्द आपटे/गौरी कुलकर्णी पराभूत वि पराग चोपडा/दिप्ती सरदेसाई 12-21, 13-21; वाईजमॅन : अविनाश दोशी/संजय फेरवाणी पराभूत वि अनिल देडगे/निलेश केळकर 14-21, 20-21; सिल्वर मिश्र दुहेरी गट: विमल हंसराज/शिवकुमार जावडेकर वि.वि निखिल चितळे/रोहन छाजेड 15-02, 15-12; सिल्वर खुला दुहेरी गट: अमोल काने/अयुष गुप्ता पराभूत वि अभिषेक ताम्हाणे/राहूल परांजपे 04-15, 10-15; गोल्ड खुला दुहेरी गट: आर्य देवधर/देवेंद्र चितळे वि.वि रणजीत पांडे/तन्मय अगाशे 21-16, 20-21, 24-16).