पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा बाद फेरीत प्रवेश
पुणे– पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाने पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा 42-34 असा पराभव करत सलग तिस-या विजयासह बाद फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरी कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाने पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा 42-34 असा पराभव करत सलग तिस-या विजयासह बाद फेरीत प्रवेश केला. 8 वर्षाखालील मिश्र गटात श्रावी देवरेने अचिंत्य कुमारचा 4-3(5) असा टायब्रेक मध्ये पराभव करत विजयी सुरूवात केली. 10वर्षाखालील मुलांच्या गटात नील केळकरने सय्यम पाटीलचा 4-0 असा सहज पराभव केला. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात अनमोल नागपुरेने सार्थ बनसोडेचा 6-4 असा तर मुलींच्या गटात रुमा गाईकैवारीने अनन्या देशमुखचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.
14वर्षाखालील दुहेरी गटात अर्जुन अभ्यंकर व वेदांत ससाणे यांनी मोक्ष सुगांधी व आदित्य भट्टेवारा यांचा 6-1 असा तर मिश्र दुहेरी गटात डेलीशा रामगट्टा व अथर्व जोशी यांनी सिमरन छेत्री व अभिनीत शर्मा यांचा 6-0 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स वि.वि पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स: 42-34(एकेरी: 8वर्षा खालील मिश्र गट: श्रावी देवरे वि.वि अचिंत्य कुमार 4-3(5); 10वर्षाखालील मुले: नील केळकर वि.वि सय्यम पाटील 4-0, 10वर्षाखालील मुली: काव्या देशमुख पराभूत वि आस्मी टिळेकर 1-4, 12 वर्षाखालील मुले: आरूष मिश्रा पराभूत वि अभिराम निलाखे 3-6, 12 वर्षाखालील मुली: रितीका मोरे पराभूत वि वैष्णवी सिंग 2-6, 14 वर्षाखालील मुले: अनमोल नागपुरे वि.वि सार्थ बनसोडे 6-4, 14 वर्षाखालील मुली: रुमा गाईकैवारी वि.वि अनन्या देशमुख 6-0, कुमार दुहेरी गट: प्रणव इंगोले/रैन मुग्गुले पराभूत वि अर्णव बनसोडे/अमोद सबनीस 3-6, 14 वर्षाखालील दुहेरी गट: अर्जुन अभ्यंकर/वेदांत ससाने वि.वि मोक्ष सुगंधी/ आदित्य भट्टेवारा 6-1, 10 वर्षाखालील दुहेरी गट: समिहन देशमुख/आर्यन किर्तने पराभूत वि मनन अगरवाल /दक्ष पाटील 1-4, मिश्र दुहेरी गट: डेलीशा रामगट्टा/अथर्व जोशी वि.वि सिमरन छेत्री/अभिनीत शर्मा 6-0)