- अभिनव सिन्हा, विकास जांगरा यांचे सनसनाटी विजय
पुणे: महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस् फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसआरए-76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात तामिळनाडूच्या सुनयना कुरुविला हिने दिल्लीच्या सान्या वत्सचा 10-12, 5-11, 11-6, 11-7, 11-7 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, प्रो कोच गटात महाराष्ट्राच्या अभिनव सिन्हा, राजस्थानच्या विकास जांगरा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय अंतिम फेरीत प्रवेश केला.
अमनोरा मॉल ग्लास कोर्ट, आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस् क्लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत महिला गटात चुरशीच्या झालेल्या लढतीत तिसऱ्या मानांकित तामिळनाडूच्या सुनयना कुरुविलाने कडवी झुंज देत काल महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित उर्वशी जोशीवर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या सान्या वत्सचा 10-12, 5-11, 11-6, 11-7, 11-7 असा पराभव केला. सामन्यात 2-0अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या सुनयनाने आपले अनुभव व कौशल्याचा सुरेख संगम साधत सान्याविरुद्ध पुढील तीनही गेम जिंकून विजय मिळवला.
प्रो कोच गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत अभिनव सिन्हा याने तिसऱ्या मानांकित पश्चिम बंगालच्या संदीप कुमार यादवचा 11-5, 11-9, 11-4 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. राजस्थानच्या विकास जांगरा याने अव्वल मानांकित कर्नाटकाच्या परमीत सिंगचा 11-8, 11-5, 11-2 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. पुरुष 45वर्षावरील गटात उपांत्य फेरीच्या लढतीत छत्तीसगडच्या तिसऱ्या मानांकित विकास नायरने दुसऱ्या मानांकित दिल्लीच्या अनिल भगतवर 5-11, 11-4, 11-8, 11-6 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अव्वल मानांकित पश्चिम बंगालच्या दलिप त्रिपाठीने महाराष्ट्राच्या आशुतोष पेडणेकरचा 6-11, 9-11, 11-6, 11-8, 11-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
पुरुष 35 वर्षावरील गटात उपांत्य फेरीत दिल्लीच्या अव्वल मानांकित अमितपाल कोहलीने आपला शहर सहकारी हरजिंदर सिंगचा 12-10, 11-6, 11-9 असा, तर महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित आदित्य माहेश्वरीने राजस्थानच्या कपिल मुर्जानीचा 11-6, 4-11, 11-5, 11-7 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पुरुष 65 वर्षावरील गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या तिसऱ्या मानांकित किशन लालने दुसऱ्या मानांकित तेलंगणाच्या श्री हरिहर सितारामला 11-4, 8-11, 11-9, 11-5 असा पराभव करून आगेकूच केली.
.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: महिला गट:उपांत्य फेरी:
सुनयना कुरुविला(तामिळनाडू)[3]वि.वि.सान्या वत्स(दिल्ली)[5]10-12, 5-11, 11-6, 11-7, 11-7
प्रो कोच: उपांत्य फेरी:
विकास जांगरा(राजस्थान)वि.वि.परमीत सिंग(कर्नाटक)[1]11-8, 11-5, 11-2;
अभिनव सिन्हा(महाराष्ट्र)वि.वि.संदीप कुमार यादव(पश्चिम बंगाल)[3]11-5, 11-9, 11-4;
पुरुष 35 वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
अमितपाल कोहली(दिल्ली)[1]वि.वि.हरजिंदर सिंग(दिल्ली)12-10, 11-6, 11-9;
आदित्य माहेश्वरी(महाराष्ट्र)[2]वि.वि.कपिल मुर्जानी(राजस्थान)11-6, 4-11, 11-5, 11-7;
पुरुष 40 वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
सौरभ नायर(छत्तीसगड)[1]वि.वि.अमित चिनाय(गुजरात)[3] 10-12, 6-11, 12-10, 11-2, 11-8;
सचिन जाधव(महाराष्ट्र)[4]वि.वि.अभिक दत्ता(महाराष्ट्र)[5]11-8, 13-11, 11-8;
पुरुष 45वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
दलिप त्रिपाठी(पश्चिम बंगाल)[1]वि.वि.आशुतोष पेडणेकर(महाराष्ट्र) 6-11, 9-11, 11-6, 11-8, 11-3;
विकास नायर(छत्तीसगड)[3]वि.वि. अनिल भगत(दिल्ली)[2] 5-11, 11-4, 11-8, 11-6;
पुरुष 50 वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
विवान खुबचंद(दिल्ली)[1]वि.वि.समीर खरे(महाराष्ट्र)8-11, 13-11, 10-12, 11-9, 11-7;
सौरभ देवकुळीयर(कर्नाटक)[6]वि.वि.जॉयसन बोथेलो(महाराष्ट्र)10-12, 9-11, 11-5, 11-1, 14-12;
पुरुष 60 वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
रवीकृष्णा बुर्ला(तेलंगणा)[3]वि.वि.शशी गुप्ता(महाराष्ट्र)11-7, 11-5, 11-7;
विजय जैनी(हरियाणा)[2]वि.वि.वामन आपटे(महाराष्ट्र)12-10, 11-5, 9-11, 11-8;
पुरुष 65 वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
राजीव रेड्डी(तामिळनाडू)[1]वि.वि.प्रविण रत्तन(महाराष्ट्र) 11-4, 11-6, 11-7;
किशन लाल(महाराष्ट्र)[3]वि.वि.श्री हरिहर सिताराम(तेलंगणा)[2]11-4, 8-11, 11-9, 11-5.