पुणे: नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत सर्वज्ञ सरोदे , श्रावी देवरे , अथर्व येलभर व रित्सा कोंदकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
मेट्रोसिटी स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लब, कोथरूड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपदाच्या लढतीत सर्वज्ञ सरोदेने नील बोंद्रेचा 7-0 असा सहज पराभव करत विजेतेपद संपादन केले. उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात नील बोंद्रेने अचिंत्य कुमारचा टायब्रेकमध्ये 6-5(6) असा तर, दुसऱ्या सामन्यात सर्वज्ञने दुस-या मानांकीत क्रिशय तावडेचा 6-3 असा पराभव केला होता. मुलींच्या गटात अव्वल मानांकीत श्रावी देवरेने सृष्टी सुर्यवंशीचा 7-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
10 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगर मानांकीत अथर्व येलभर याने चौथ्या मानांकीत राम मगदुमचा 7-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. अथर्व हा म्हाळुंगे येथे जिल्हा परिषद शाळेत चौथी इयत्तेत शिकत असून ओडीएमटी येथे प्रशिक्षक मारूती राऊत व संतोष कु-हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या गटात दुस-या मानांकीत रित्सा कोंदकरने चौथ्या मानांकीत आरोही देशमुखचा 7-5 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. रित्सा भुगाव येथे संस्कृती स्कुलमध्ये तिसरी इयत्तेत शिकत असून मेट्रोसिटी स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लबमध्ये नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी येथे प्रशिक्षक नवनाथ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मेट्रोसिटी ग्रुपचे सदस्य सुधिर धावडे, फिनआयक्यूचे प्रोजेक्ट मॉनेजर सागर पाषाणकर व फिनआयक्यूचे स्पोर्टस् मॉनेजर सुशील जोसेफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नवनाथ शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- 8 वर्षाखालील मुले- उपांत्य फेरी
नील बोंद्रे वि.वि अचिंत्य कुमार 6-5(6)
सर्वज्ञ सरोदे वि.वि. क्रिशय तावडे(2) 6-3
अंतिम फेरी- सर्वज्ञ सरोदे वि.वि नील बोंद्रे 7-0
8 वर्षाखालील मुली- उपांत्य फेरी
श्रावी देवरे(1) वि.वि स्वरा जवळे(3) 6-2
सृष्टी सुर्यवंशी वि.वि अनुष्का जोगळेकर 6-4
अंतिम फेरी- श्रावी देवरे(1) वि.वि सृष्टी सुर्यवंशी 7-4
10 वर्षाखालील मुले- उपांत्य फेरी
अथर्व येलभर वि.वि समिहन देशमुख 6-1
राम मगदुम(4)वि.वि दक्ष पाटील(2) 6-3
अंतिम फेरी- अथर्व येलभर वि.वि राम मगदुम(4) 7-3
10 वर्षाखालील मुली- उपांत्य फेरी
आरोही देशमुख(4) वि.वि प्रेक्षा प्रांजल 6-4
रित्सा कोंदकर(2) वि.वि स्वानीका रॉय(3) 6-4
अंतिम फेरी- रित्सा कोंदकर(2) वि.वि आरोही देशमुख(4) 7-5