पुणे- नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या फिनआयक्यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत आदित्य योगी, मिहीर कदम, अंशूल पुजारी, विरेन चौधरी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित दिवीज पाटीलने स्मित उंद्रेचा 6-0 असा सहज पराभव केला. नील केळकर याने मिहीर कदमचा 6-0 असा तर, नमिश हूडने स्वर्णीम येवलेकरचा 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. तिसऱ्या मानांकित ओम वर्माने पृथ्वीराज दुधानेवर 6-0 असा विजय मिळवला.
मुलींच्या गटात रित्सा कोंडकर,दिया अगरवाल, स्वनिका रॉय, सिद्धी मिश्रा, श्रावी देवरे यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 10 वर्षाखालील मुले:
दिवीज पाटील(1) वि.वि.स्मित उंद्रे 6-0;
वीरेन चौधरी वि.वि.आयुष खादादे 6-2;
राम मगदूम वि.वि.आदित्य योगी 6-1;
नील केळकर वि.वि.मिहीर कदम 6-0;
नमिश हूड वि.वि.स्वर्णीम येवलेकर 6-2;
अहाण शेट्टी(5) वि.वि.सुश्रुत बोरगावकर 6-0;
अर्जुन परदेशी वि.वि.सोहम नाग 6-3;
चिन्मय ठाकरे वि.वि.क्षितिज अमीन 6-4;
आयुष पुजारी(7) वि.वि.ईशान ओक 6-0;
ओम वर्मा(3) वि.वि.पृथ्वीराज दुधाने 6-0;
10 वर्षाखालील मुली: पहिली फेरी:
रित्सा कोंडकर वि.वि.प्रांजली पंडुरे 6-0;
दिया अगरवाल वि.वि.आदिती सागवेकर 6-5(5);
स्वनिका रॉय वि.वि.वंशिका अगरवाल 6-5(3);
सिद्धी मिश्रा वि.वि.दिया बोरुंदीया 6-2;
श्रावी देवरे वि.वि.स्वरा जावळे 6-0.